साबलखेड-आष्टी-चिंचपूर रस्ता वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:33+5:302021-08-25T04:38:33+5:30
नितीन कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क कडा : अहमदनगर-आष्टी-जामखेड हा रस्ता अंत्यत खराब झाला होता. तो काही महिन्यापूर्वी नगर ...
नितीन कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : अहमदनगर-आष्टी-जामखेड हा रस्ता अंत्यत खराब झाला होता. तो काही महिन्यापूर्वी नगर पासून साबलखेड पर्यंत पूर्ण झाला आहे. परंतु आष्टीपर्यंत या रस्त्याचे काम रखडले आहे. आष्टीपासून चिंचपूर पर्यंत काम पूर्ण झाले आहे. परंतु जामखेड पर्यंत मंजुरी नसल्याने काम झालेले नाही. त्याचा प्रस्ताव शासनदरबारी पडून आहे.
नगर - आष्टी- जामखेड हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. काही वर्षांपासून तो आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे वर्ग झाला. नगर ते साबलखेड असा रस्ता बनविण्यात आला. पण साबलखेड ते आष्टी व चिंचपूर ते जामखेड असा २० किलोमीटर अंतराचा रस्ता मध्येच अपूर्ण राहिला आहे. या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. हा रस्ता अंत्यत खराब झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्त्यावर अपघात वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे हा रस्ता मंजूर नसल्याने काम रखडले असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी प्रस्ताव पाठवून त्याला मंजुरी देखील मिळाली होती. त्याचे टेंडर देखील निघाले पण कुठे माशी शिंकली आणि ते टेंडर रद्द झाल्याने हा रस्ता रखडला.
....
लोकप्रतिनिधीनो, उघडा डोळे बघा नीट...
जामखेड ते साबलखेड रस्ता अंत्यत खराब झाला आहे. मोठ मोठी खड्डे चुकवताना अपघात घडत आहेत. अनेकांचा जीव गेला आहे. तर शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आले आहेत. रोजच अपघाताच्या मालिका घडत असताना लोकप्रतिनिधींकडून कसलीच दखल घेतली जात नाही, असा आरोप शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी उपस्थित केला आहे.
...
मंजुरी मिळताच काम सुरू
वरिष्ठ पातळीवर आता नव्याने याचा पाठपुरावा सुरू आहे. साधारणतः १८ कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या कामाला मंजुरी मिळताच अर्धवट राहिलेले काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता दिलीप तारडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
...