सचिन-सुनिलचं काय चुकलं?, पाकिस्तानला हरवण्याची धमक असलेल्यांवर टीका का?; शरद पवारांची 'बॅटिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 09:36 AM2019-02-24T09:36:54+5:302019-02-24T10:50:47+5:30

मोदी सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.

'Sachin has hit Pakistan on 15th year', sharad Pawar' support sachin tendulkar ' | सचिन-सुनिलचं काय चुकलं?, पाकिस्तानला हरवण्याची धमक असलेल्यांवर टीका का?; शरद पवारांची 'बॅटिंग'

सचिन-सुनिलचं काय चुकलं?, पाकिस्तानला हरवण्याची धमक असलेल्यांवर टीका का?; शरद पवारांची 'बॅटिंग'

Next

बीड - मोदी सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली. सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावसकर यांच्या भूमिकेत काय चुकले ? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी दोन्ही क्रिकेटर्सची पाठराखण केली आहे. भारत-पाकिस्तान सामना खेळू दिला पाहिजे, असे सचिनने म्हटले होते. तसेच, पाकिस्तानला पराभूत करण्याची ताकत टीम इंडियात असल्याचेही तो म्हणाला होता. या विधाननंतर सचिनवर टीकेची झोड उठली, याबाबत भाष्य करताना पवार यांनी सचिनची पाठराखण केली आहे.  

परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या वतीने शनिवारी दुसऱ्या संयुक्त जाहीर सभेत पवार बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

या सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाची आरक्षणाच्या मुद्दावर फसवणूक केली आहे. शेतकरी, तरु ण बेरोजगारांचीही दिशाभुल केली आहे. जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविला जात आहे. आरक्षणाच्या माध्यमातूनही जातीय धोरण अवलंबिले जात आहे. जनतेत दुही पसरविण्याचे काम सरकारकडून होत असल्याचे पवार म्हणाले.


मी आयसीसीचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. जगाचे क्रिकेट मी अनुभवले आहे. मात्र, त्या क्रिकेट खेळामध्येही वाद घातला जात आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर अशा महान खेळाडूंचा अपमान केला जात आहे. सचिन तेंडुलकर यांनी एक भूमिका मांडली की, भारताच्या खेळाडूंना पाकिस्तानशी सामना करू द्या. त्यांचा पराभव करण्याची धमक आमच्या खेळाडूंमध्ये आहे मात्र, त्यांच्यावर जातीयवाद आणि पाकिस्तान प्रेमाचा ठपका ठेवला गेला. ज्यांनी सचिनवर आरोप केला त्यांना माहिती नाही, वयाच्या 15 व्या वर्षी सचिनने पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानचा पराभव केला होता. पराभव करण्याची धमक ज्या सचिनमध्ये आहे, त्यावर आरोप केले गेले याची खंत वाटते. याचे एकच कारण आहे, यांना विष पसरवायचे आहे. त्यांना उत्तर देण्याची आणि धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर जहाल शब्दात टीका केली. तसेच एकप्रकारे सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांची पाठराखणही केली आहे. 
 

Web Title: 'Sachin has hit Pakistan on 15th year', sharad Pawar' support sachin tendulkar '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.