मंजुषा कुलकर्णीना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:40+5:302021-09-22T04:37:40+5:30
आतापर्यंत कुलकर्णी यांची २५ पुस्तके प्रकाशित आहेत. २३ पुस्तके प्रकाशनासाठी तयार आहेत. नुकतेच त्यांनी डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या ...
आतापर्यंत कुलकर्णी यांची २५ पुस्तके प्रकाशित आहेत. २३ पुस्तके प्रकाशनासाठी तयार आहेत. नुकतेच त्यांनी डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या जीवनचरित्राचा संस्कृत अनुवाद लिहिला आहे. कुलकर्णी या परळीच्या कन्या असून त्यांचे शालेय शिक्षण वैद्यनाथ विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण लिटल फ्लाॅवर स्कूलमध्ये झालेले आहे. आंबेवेस भागात राहणारे पंढरीनाथ कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत. ‘प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचे आत्मचरित्र २०१७ साली संस्कृतमध्ये डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी अनुवादित करून प्रकाशित केेले आहे. मराठी पुस्तकाला संस्कृत अनुवादासाठी मिळालेला हा गौरव समग्र महाराष्ट्र आणि भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे एम.ए. (संस्कृत), एम.एड्., पीएच.डी. (संस्कृत) अनुक्रमे पुणे विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांकाने पूर्ण झालेले आहे. पहिली महिला भाषा संचालक महाराष्ट्र राज्य म्हणून काम करण्याचा मानदेखील मंजुषा यांना मिळालेला आहे. त्यांनी २१ वर्षे अध्यापनाचेदेखील काम केले आहे.
210921\21_2_bed_16_21092021_14.jpg
मंजुषा कुलकर्णी