सांगितले जुळे निघाले तिळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:16 AM2019-06-26T00:16:29+5:302019-06-26T00:18:33+5:30
एक महिला प्रसव वेदनेने स्वारातीच्या प्रसुती कक्षात दाखल झाली. या महिलेच्या जुन्या खाजगी दवाखान्यातील तीन सोनोग्राफीमध्ये जुळ्यांचा गर्भ असल्याचे सांगितले होते.
अंबाजोगाई : एक महिला प्रसव वेदनेने स्वारातीच्या प्रसुती कक्षात दाखल झाली. या महिलेच्या जुन्या खाजगी दवाखान्यातील तीन सोनोग्राफीमध्ये जुळ्यांचा गर्भ असल्याचे सांगितले होते. डॉ. मिताली यांनी महिलेची तपासणी केली असता पहिले बाळ आडवे असल्या कारणाने महिलेवर सीझर करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांनंतर या महिलेची प्रथमच गर्भधारणा होती.
शस्त्रक्रियेदरम्यान पहिल्या आडव्या बाळाची प्रसुती केल्यानंतर दुसऱ्या बाळाची पायाळू प्रसुती करण्यात आली. त्यानंतर तिसºया बाळाची हालचाल डॉक्टरांना जाणवली. तेव्हा डॉ. मिताली यांनी त्या बाळाची पायाळू पद्धतीने प्रसुती केली. तिळ्यांचा गर्भ असल्याने सदरील महिलेला अती रक्तस्त्राव होऊ लागला पण डॉ. मिताली यांनी यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करून महिलेचे प्राण वाचवले.
जुळ्यांचा गर्भ असून तिळे जन्माला आल्याचे पाहून रु ग्ण व नातेवाईकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणि आनंद द्विगुणित ऐवजी त्रिगुणित झाला. सध्या या बाळामधील एक मुलगी २ किलो वजनाची असून आईच्या कुशीत सुखरूप आहे तर १.५ किलो वजनाच्या दोन मुलांवर कमी वजन असल्याने उपचार सुरू आहेत. या शस्त्रक्रि येत डॉ. मिताली गोलेच्छा यांना डॉ. प्रियंक सिंह दासीला, डॉ.पूनम देसाई, डॉ. अर्चना, डॉ.अभिजित, स्टाफ जयश्री, भूलतज्ज्ञ डॉ. देवानंद पवार यांचे सहकार्य मिळाले. या कार्यासाठी डॉ. सुधीर देशमुख, डॉ.संजय बनसोडे, डॉ. तोंडगे यांनी स्वागत केले.
वंध्यत्व निवारण व गर्भधारणेच्या गोळ्यांमुळे तिळ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे . आणि हे बाळ बºयाचदा आडवे किंवा पायाळू असल्यामुळे सीझर करावे लागते. तसेच प्रसुतीपश्र्चात अति रक्तस्त्राव होण्याचा धोका संभवतो.
- डॉ.मिताली गोलेच्छा