दिंद्रूडमध्ये शीतपेयांच्या दुकानातून बनावट दारूची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:11 AM2019-04-12T00:11:47+5:302019-04-12T00:12:44+5:30

घरी बनवलेली दारू नंतर बसस्थानकावर असलेल्या कोल्ड्रिंक्सच्या दुकानातून विक्री करणाऱ्या एकाचा विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे.

The sale of fake liquor from the beverages shop in Dindrugud | दिंद्रूडमध्ये शीतपेयांच्या दुकानातून बनावट दारूची विक्री

दिंद्रूडमध्ये शीतपेयांच्या दुकानातून बनावट दारूची विक्री

Next
ठळक मुद्देविशेष पथकाकडून पर्दाफाश २० हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बीड : घरी बनवलेली दारू नंतर बसस्थानकावर असलेल्या कोल्ड्रिंक्सच्या दुकानातून विक्री करणाऱ्या एकाचा विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. दारूसह त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास केली.
रामेश्वर मारोती काळे (४५, रा. दिंद्रूड) असे आरोपीचे नाव आहे. काळे याचे दिंद्रूडपासून अवघ्या काही अंतरावर शेत आहे. त्याचे शेतातच एक छोटेसे घर आहे. याच घरात तो बनावट दारू तयार करून बाटली सीलबंद करीत असे. त्यानंतर ही दारू दिवसा परळी-बीड रोडवर असणाºया कोल्ड्रिंक्सच्या दुकानात आणून विक्री करीत होता. हीच माहिती पोउपनि रामकृष्ण सागडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावला. दारू बनविताना त्याला सायंकाळच्या सुमारास रंगेहाथ बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याच्या दुकानातूनही दारू जप्त करण्यात आली.
त्याच्याकडून जवळपास २० हजार ४३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काळे याच्यावर दिंद्रूड पोलीस ठाण्यात बनावट दारू तयार करून मानवी जीवनास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच माहिती असूनही असे कृत्य केल्याने विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, रेवणनाथ दुधाने, जयराम उबे, गणेश नवले आदींनी केली.

Web Title: The sale of fake liquor from the beverages shop in Dindrugud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.