बसस्थानकासाठी साळेगाव ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:40+5:302021-08-26T04:35:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केज : साळेगाव येथील माथेफिरूने पाडलेल्या बसस्थानकाचे काम तत्काळ करण्यात यावे, या मागणीसाठी साळेगावचे सरपंच, उपसरपंचासह ...

Salegaon villagers fast for bus stand | बसस्थानकासाठी साळेगाव ग्रामस्थांचे उपोषण

बसस्थानकासाठी साळेगाव ग्रामस्थांचे उपोषण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : साळेगाव येथील माथेफिरूने पाडलेल्या बसस्थानकाचे काम तत्काळ करण्यात यावे, या मागणीसाठी साळेगावचे सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांनी बुधवारी बसस्थानकाच्या जागेवर उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला बसण्यापूर्वी उपोषणार्थींनी गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत-गाजत रॅली काढून उपोषणाला सुरुवात केली.

साळेगाव येथील बसस्थानक २३ मे रोजी अज्ञात माथेफिरूने पाडल्याने प्रवाशांसह, विद्यार्थी विद्यार्थिनींना बसची वाट पाहत रस्त्यावर ताटकळत उभे रहावे लागत आहे. पाडलेले बसस्थानक तत्काळ बांधावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे, माजी उपसरपंच श्रीमंत गित्ते यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गौतम बचुटे, ओमप्रकाश मुळे, शिवसेनेचे ज्योतीकांत कळसकर, ज्योतीराम बचुटे, महादेव गायकवाड, पांडुरंग इंगळे, संजय इंगळे, भागवत मुळे, गणेश गालफाडे यांच्यासह ग्रामस्थांनी बुधवारी बसस्थानकाच्या जागेवर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

250821\img-20210825-wa0012.jpg

साळेगाव येथील बस स्थानक प्रश्नी सरपंच व ग्रामस्थांनी उपोषण चालू केले आहे.

Web Title: Salegaon villagers fast for bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.