शेतकऱ्याच्या मुलीच्या जिद्दीला सलाम; आई-वडिलांना कामात मदत करत बनली कर सहायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:29 PM2020-07-22T12:29:43+5:302020-07-22T13:44:06+5:30

आई-वडिलांना कामात मदत करून केला अभ्यास

Salute the stubbornness of the farmer's daughter; Helping parents with work became a tax assistant | शेतकऱ्याच्या मुलीच्या जिद्दीला सलाम; आई-वडिलांना कामात मदत करत बनली कर सहायक

शेतकऱ्याच्या मुलीच्या जिद्दीला सलाम; आई-वडिलांना कामात मदत करत बनली कर सहायक

Next
ठळक मुद्देशेतकऱ्याची मुलगी बनली कर सहायक

बीड : जिद्दीला परिश्रमाची जोड दिली की यश मिळतेच हे वडवणी तालुक्यातील लिमगाव (खळवट) येथील रेवती रंगनाथ बाबरे हिने दाखवून दिले आहे. तिची कर सहायक म्हणून निवड झाली आहे. आई-वलिडांना शेतातील कामात मदत करून तिने अभ्यास केला होता. अखेर तिच्या परिश्रमाला यश मिळाल्योन सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

रेवती सामान्य कुटूंबातील आहे. आई-वडील शेतकरी. त्यामुळे मोठ्या शहरात शिक्षण घेणे अवघड होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर मागील काही वर्षांपूर्वी शुभांगी व रेवती या दोघी बहिणी औरंगाबादला अभ्यासासाठी गेल्या. दिवसरात्र अभ्यास करून रेवतीने कर सहायकाची पदवी मिळविली आहे. मंगळवारी याचा निकाल जाहिर झाला. यात तीने १२४ गुण मिळविले आहेत. जिद्दीने अभ्यास करून तिने आई-वडिलांच्या कष्टाला कर सहायक पदवी मिळवून फळ दिले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

अनेकदा परीक्षा दिल्या. परंतु काही गुणांवरून हुलकावणी मिळत होती. परंतु मी जिद्द सोडली नाही. याच जिद्दीला आज यश मिळाले आहे. माझ्या यशात माझ्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटूंब आणि गुरूजनांचा मोठा वाटा आहे. प्रामाणिक कर्तव्य बजावून जनसेवा करेल.
- रेवती बाबरे,कर सहायक, लिमगाव खळवट

Web Title: Salute the stubbornness of the farmer's daughter; Helping parents with work became a tax assistant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.