केजमध्ये पिकविम्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:00 PM2018-06-21T17:00:18+5:302018-06-21T17:00:18+5:30
छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
केज (बीड ) : तालुक्यातील शेतकर्यांना गतवर्षीचा खरीप पिकांचा विमा देण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
तालुक्यातील शेतकर्यांनी गतवर्षीच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना घेतली. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील सोयाबीन, कापूस, मुग आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. असे असतानाही पिकांच्या उत्पन्नाच्या चुकीच्या नोंदी शासकीय यंत्रणेने घेतल्या. यामुळे तालुक्यातील शेतकर्यांना पीकविमा योजनेतून वगळण्यात आले. या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत सहभागी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने 7 जुन रोजी केली शासनाकडे केली. मात्र याची प्रशासनाने दखल घेतली नाही व शेतकर्यांना पीकविमा योजनेत सहभागी केले नाही.
यामुळे संभाजी ब्रिगेडने सर्व शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा योजना लागू करावा अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी 11 वाजता रस्तारोको आंदोलन केले. तब्बल हे आंदोलन चाले यामुळे वाहतुकीला चांगलाच फटका बसला. यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार आशा वाघ यांनी स्वीकारले. आंदोलनात संघर्ष विकास समितीचे प्रा हनुमंत भोसले, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहूल खोडसे, योगेश अंबाड, विलास गुंठाळ, मनोज चौधरी, नरशिंग यादव, रामचंद्र चौधरी, हमीद शेख आदींचा सहभाग होता.