नेकनुरातील नदीपात्रातून वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:20+5:302021-06-09T04:41:20+5:30

दुचाकीस्वारांना होतोय धुळीचा त्रास अंबाजोगाई : शहरातील रिंग रोडचे काम गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदार यांनी ...

Sand extraction from the river basin at Neknura | नेकनुरातील नदीपात्रातून वाळूउपसा

नेकनुरातील नदीपात्रातून वाळूउपसा

Next

दुचाकीस्वारांना होतोय धुळीचा त्रास

अंबाजोगाई : शहरातील रिंग रोडचे काम गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदार यांनी एका बाजूने रस्ता उखडून व खाेदून ठेवला. मात्र, रस्त्याचे काम केले नाही. परिणामी, रस्त्यावर मोठी धूळ साठली आहे. याचा मोठा त्रास वाहनचालकांना होत आहे. या रस्त्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

अंबाजोगाई : उन्हाळी हंगामात शेतकरी प्रामुख्याने खरीप हंगामाची तयारी करतात. पेरणीपूर्वी शेतजमीन नांगरणे, कोळपणे, वेचणी करणे. बांधावर उगवलेली झाडे-झुडपे काढणे आदी कामे सुरू आहेत. या सर्व कामांना वेग आला आहे.

थंडी-तापाचे रुग्ण वाढले

अंबाजोगाई : तालुक्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोन वेळा पाऊस पडला. तर आता दररोज आभाळ भरून येते. त्यामुळे कधी ऊन तर कधी पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत असून, उपचार करून घेण्यासाठी गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.

कर्जवसुली थांबविण्याची मागणी

अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ बंद आहे. सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यांतील महिला बचत गटांना बँकांनी दिलेली कर्जवसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजदरही रद्द करावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Sand extraction from the river basin at Neknura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.