नेकनूर परिसरातील नद्यातून वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:21+5:302021-04-18T04:33:21+5:30
बीड : तालु्क्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने ...
बीड : तालु्क्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे संबंधित महसूल विभाग व नेकनूर पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. वाळूचा उपसा बंद करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
माजलगावात भुरट्या चोरांचा वावर
माजलगाव : गाडीतील पेट्रोल, बॅटरी, पाण्याची मोटार, पाइप, वायर अशा कंपाऊंडमधील वस्तूंच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. शहरातील गजानननगर, शाहूनगर, मंगलनाथ कॉलनी, समता कॉलनी भागातील घराच्या कंपाऊंडमधील साहित्याची सर्रास चोरी होत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्ता दुरुस्ती करा
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
नियमांचे उल्लंघन
बीड : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू विक्रेते व नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे मात्र व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले आहे. दुकानात ग्राहकांसाठी सामाजिक अंतर, दुकानाबाहेर चौकट आखणी कुठेच दिसत नसून सॅनिटायझरचा वापरही केला जात नाही.