सिंदफणा पात्रात वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:23 AM2021-01-01T04:23:10+5:302021-01-01T04:23:10+5:30

नगर पंचायत कर्मचाऱ्याचे उपोषण बीड : वडवणी नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू केलेले असताना किमान वेतन अद्याप न ...

Sand extraction in Sindfana container | सिंदफणा पात्रात वाळू उपसा

सिंदफणा पात्रात वाळू उपसा

Next

नगर पंचायत कर्मचाऱ्याचे उपोषण

बीड : वडवणी नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू केलेले असताना किमान वेतन अद्याप न मिळाल्याने बाबासाहेब भीमराव तिडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. तिडके हे १६ डिसेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या निवासासमोर उपोषण केल्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना करूनही कार्यवाही झाली नसल्याने उपोषण सुरू आहे.

अंबाजोगाईत कार्यकर्त्यांची बैठक

अंबाजोगाई : पुरोगामी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी गटातटाने एकत्र येण्याचे आवाहन जनता दलाच्या नेत्या प्रा. सुशीला मोराळे यांनी केले. अंबाजोगाईत कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. अंबाजोगाई शहर समाजवादी चळवळीचा व आंदोलनाचा बालेकिल्ला आजही असून विखुरलेला जनता दल परिवार एकत्र आणण्यासाठी वाजेद खतीब व बन्सी जोगदंड यांनी छोटेखानी बैठकीचे आयोजन केले होते.

बिल्डिंग पेंटर संघटनेतर्फे उपक्रम

बीड : जिल्हा बिल्डिंग पेंटर संघटनेच्या वतीने एड‌्सबाधित मुलांना शिक्षणासाठी पुस्तक संच, मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी ८ वर्षांत संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी भारत देशमाने, शेख मोईनोद्दीन, भारत स्के, मारुती शिंदे, सय्यद अज्मत अली, काजी ताहेर, मोहम्मद एकबाल, शे. अब्दुल गनी, मिर्झा शहेबाज बेग, शेख नजीर, शेख सलीम पेंटर आदी उपस्थित होते.

Web Title: Sand extraction in Sindfana container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.