गोदाकाठच्या गावांमध्ये कोरोनाला वाळूमाफियांचे खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:31 AM2021-05-17T04:31:51+5:302021-05-17T04:31:51+5:30

तलवाडा : गेवराई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, दररोज शेकडो नवीन रुग्णांची भर पडत आहे. ही संख्या ...

Sand mafia fertilization of corona in Godakath villages | गोदाकाठच्या गावांमध्ये कोरोनाला वाळूमाफियांचे खतपाणी

गोदाकाठच्या गावांमध्ये कोरोनाला वाळूमाफियांचे खतपाणी

Next

तलवाडा : गेवराई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, दररोज शेकडो नवीन रुग्णांची भर पडत आहे. ही संख्या वाढवण्यास अवैध वाळू उपसादेखील जबाबदार असल्याचे दिसत आहे.

प्रशासनाकडून एकीकडे रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत, तर दुसरीकडे गोदाकाठावरील गावांत होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गोदाकाठावरील गावे भीतीच्या छायेत वावरत आहे.

तालुक्यातील खुले वाळूसाठे सोडता अनेक गावांतून केनीद्वारे वाळू उपसा होत आहे. या गावांसह अनेक गावांतून होणाऱ्या छुप्या वाळू वाहतुकीमुळे कोरोनाला खतपाणी मिळताना दिसत आहे. हा वाळू उपसा करण्याकरिता या गावांत केनीवाले लोक बिनधास्तपणे चकरा मारत सामान्य लोकांत वावरत असल्याने संसर्गाचा धोका वाढत असल्याने ही गावे भयभीत झालेली आहेत. त्यामुळे शासन कोरोना कमी व्हावा म्हणत उपाययोजना करत आहे, तर दुसरीकडे प्रशासन असल्या कोरोना वाढवणाऱ्या धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याने कोरोना कधी कमी होणार हा संशोधनाचा विषय झाला आहे.

माफियांसह पंटर, लोकेशनवाले, ट्रक्टरसह, टिप्पर, केनीचालक बाहेरचे

संगम जळगाव, हिंगणगाव, गंगावाडी, राजापूर, काठोडा या गावातून केनीद्वारे वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफिया तसेच सोबत चार-पाच पंटर, लोकेशनवाले तीन-चारजण, ट्रॅक्टरसह टिप्पर व केनीचालक मजूर, असा २५ जणांचा जत्था गावात संपर्कात येतो. त्यामुळे कुठे संपर्क नसणारेही पाॅझिटिव्ह येत आहेत. हा उपसा बंद करुन या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करताना दिसत आहेत.

दीड हजारांत ४० जण कोरोनाबाधित

तालुक्यातील गोदाकाठावरील राजापूर हे गाव दोन भागांत विभागणी झाल्याने गोदाकाठी १५०० पर्यंत लोकसंख्या म्हणजे १२००-१२५ उंबरठा, पण या गावांत जवळपास ३०-४० जण पाॅझिटिव्ह आलेले असून, दोन धडधाकट अनुक्रमे २५ व ४० वर्षीय तरुणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. तपासणी केल्यास आणखी किती पॉझिटिव्ह वाढतील हे वेगळेच. त्यामुळे आम्ही गावातून जास्त बाहेर संपर्क ठेवत नाहीत, तरीही ते लोक संपर्क करून रोग वाढवत असल्याचे गावकरी म्हणतात.

सध्या कोरोनाच्या काळात सगळीकडे कडेकोट बंदोबस्त आहे. रस्त्यावर बॅरिकेट आहे. तरीही गोदाकाठी अवैध वाळू उपसा चालूच असल्याने यांची हफ्तेखोरी असल्याचे दिसते. त्यामुळे अनेक गावांत कोरोनाने शिरकाव केलेला आहे. यंत्रणेेने हफ्तेखोरी थांबवून हे प्रकार रोखावेत नसता मनसेस्टाइल आंदोलन केले जाईल.

राजेंद्र मोटे, जिल्हाध्यक्ष, मनसे

अवैध वाळू उपशाबद्दल कारवाई करण्याबाबत संबंधित तलाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पुन्हा सूचना देऊन अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यात येईल.

-सचिन खाडे, तहसीलदार, गेवराई

Web Title: Sand mafia fertilization of corona in Godakath villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.