वाळू माफियांना दणका; १० वाहनांवर कारवाई, ३ लाखांचा दंड वसूल

By शिरीष शिंदे | Published: April 7, 2023 05:54 PM2023-04-07T17:54:39+5:302023-04-07T17:55:19+5:30

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह महसूल पथकाची कारवाई

sand mafia hits; Action taken against 10 vehicles, fine of 3 lakhs collected | वाळू माफियांना दणका; १० वाहनांवर कारवाई, ३ लाखांचा दंड वसूल

वाळू माफियांना दणका; १० वाहनांवर कारवाई, ३ लाखांचा दंड वसूल

googlenewsNext

बीड : उपप्रादेशिक परिवहन विभाग व गेवराई तहसील यांच्या संयुक्त पथकाने अवैधरीत्या वाळू तस्करी करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई केली. सदरील वाहनांवर क्रमांक, रिफ्लेक्टर नसणे या कारणांवरून एकूण २ लाख ८८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

गेवराई तालुक्यातील नदीपात्रातून सर्रासपणे अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जाते. अशा वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभाग व महसूल विभाग यांच्यामार्फत संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. गेवराई मार्गे बीड शहराकडे येणाऱ्या १० वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये पथकाला वाळू आढळून आली. तसेच, कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये क्रमांक नसलेली वाहने, रिफ्लेक्टर नसलेली वाहने आढळून आली. अवैधपणे वाळू वाहतूक करणारी वाहने, तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील रस्ता सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक नियमांचे पालन न केल्याने ही वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहे. यापुढे अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहने ब्लॅकलिस्ट 
परिवहन विभाग व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाच्या तपासणीत १० वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाहनांवर क्रमांक, रिफ्लेक्टर नसणे या कारणांवरून एकूण २ लाख ८८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रत्येक वाहनधारकास जवळपास ३० हजार रुपये दंड देत वसूल केला. तसेच, ही वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहेत.
- स्वप्नील माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड

Web Title: sand mafia hits; Action taken against 10 vehicles, fine of 3 lakhs collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.