वाळू माफिया-अधिकाऱ्यात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:22 PM2019-09-28T23:22:21+5:302019-09-28T23:23:14+5:30

वाळू माफिया व अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष उद्भवला.

Sand Mafia-officer clashes | वाळू माफिया-अधिकाऱ्यात संघर्ष

वाळू माफिया-अधिकाऱ्यात संघर्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेवराई तालुक्यातील राजापूर, बेलगुडवाडी परिसरात अवैधरित्या वाळू उत्खनन सुरु होते. याची माहिती गौण खनिज अधिकारी आनंद पाटील यांना मिळताच त्यांनी संबंधित तलाठी प्रकाश निकाळजे यांच्याशी संपर्क साधला. त्या ठिकाणी संयुक्त कारवाई करण्यासाठी गेले असता वाळू माफिया व अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष उद्भवला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व अधिकाºयांना दमदाटी केल्याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील राजापूर परिसरात जिल्हाधिका-यांनी कारवाई करुन देखील अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक सुरु आहे. शुक्रवारी याच परिसरातील कापसी नदीपात्रात जेसीबी व दोन विनानंबरच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा व वाहतूक केली जात होती. याची माहिती माहिती गौण खनिज अधिकारी आनंद पाटील यांना मिळताच त्यांनी तलाठी प्रकाश निकाळजे, सोबत तीन माजी सैनिक अंगरक्षक असे मिळून कारवाई करण्यासाठी नदीपात्रात उतरले. यावेळी अवैध वाळू उत्खनन करणारा लखन तुकाराम काळे, त्याची आई व इतर आठ ते दहा महिला - पुरुष (सर्व रा. राजापूर) हे जेसीबी व ट्रॅक्टरसमोर उभे राहिले. तसेच अधिका-यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली. तसेच कारवाईमध्ये अडथळा आणून जप्त केलेले जेसीबी व दोन ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत.
गेवराई, तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतून अवैधरित्या वाळू वाहतूक उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. याकडे ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Sand Mafia-officer clashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.