वाळू ‘रेट कार्ड’ प्रकरणात घेतले जाणार जबाब -पोद्दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:49 PM2019-08-22T23:49:27+5:302019-08-22T23:50:04+5:30
वाळू वाहतूक व ठेकेदारांनी जून महिन्यात वाळू वाहतूक करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना किती हप्ता द्यावा लागतो याचे ‘रेट कार्ड’ सह निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दिले होते.
बीड : वाळू वाहतूक व ठेकेदारांनी जून महिन्यात वाळू वाहतूक करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना किती हप्ता द्यावा लागतो याचे ‘रेट कार्ड’ सह निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दिले होते. यामधील २० जणांचे तसेच पोलीस अधिकाºयांचे जवाब आतापर्यंत नोंदवण्यात आले आहेत. या सोबतच आणखीही २० वाहतुकदारांचे जवाब नोंदवले जाणार आहेत. याप्रकरणात दोषी आढळल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाºयांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कारवाई सुरु करत जून महिन्यात संबंधित पोलीस व महसूल अधिकारी यांची बैठक घेतली होती. यावेळी वाळू वाहतूकदार व ठेकेदार यांना देखील बोलावण्यात आले होते. दरम्यान या बैठकीमध्ये एका पोलीस अधिकाºयाने वाळू वाहतूक करणारे चोर आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर वाळू वाहतूक करणारे व ठेकेदार वाळू वाहतूक करण्यासाठी महिना ७ लाख ११ हजार रुपये हप्ता पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकाºयांना द्यावा लागत असल्याचे निवेदन दिले होते. या निवेदनावर २८ जणांनी स्वाक्षरी केल्या होत्या, त्यापैकी काहींचे जबाब तत्कालीन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या उपस्थितीमध्ये इन कॅमेरा नोंदवले होते. त्यानंतर या निवेदनात सहभागी झालेल्या काही जणांनी या तक्रारीमधून मागार घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. जे ठाम आहेत त्यांचे जबाब लवकरच नोंदवले जाणार आहेत. त्यासोबतच आणखी २० व्यक्तींचे जवाब नोंदवले जाणार आहेत.या ‘रेट कार्ड’ प्रकरणात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई होणार असल्याचे संकेत हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत.
निवेदन देणाºयांवर दबाव ?
२१ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस व वाळू कंत्राटदार - वाहतूकदार झालेल्या बैठकीत आरोप - प्रत्यारोप नाट्यानंतर देण्यात आलेल्या निवेदनावर ४८ जणांनी स्वाक्षरी केल्या होत्या.
या निवेदनातील काही जणांवर संबंधित अधिकाºयांकडून दबाव आणला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच काही वाळू वाहतूकदार, ठेकेदारांवर याप्रकरणामुळे कारवाई केली असल्याची देखील चर्चा आहे.