चंदन चोरांना दिला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:20 PM2020-10-10T13:20:05+5:302020-10-10T13:20:48+5:30

नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुजू होताच चंदन चोरांना मोठा झटका दिला. जायभाये यांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई- अहमदपूर मार्गावरील पिंपळा धायगुडा शिवारात सापळा रचून चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या ६४ हजारांच्या चंदनासह एकूण ५ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Sandalwood thieves caught by police | चंदन चोरांना दिला दणका

चंदन चोरांना दिला दणका

googlenewsNext

अंबाजोगाई : नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुजू होताच चंदन चोरांना मोठा झटका दिला. जायभाये यांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई- अहमदपूर मार्गावरील पिंपळा धायगुडा शिवारात सापळा रचून चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या ६४ हजारांच्या चंदनासह एकूण ५ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

शुक्रवारी (दि. ०९) दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत एका चंदनचोरास अटक करण्यात आली असून केजच्या माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथून चोरीचे चंदन घेऊन एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी अंबाजोगाईच्या दिशेने निघाल्याची गुप्त माहिती उपविभागीय अधिकारी सनिल जायभाये यांना मिळाली. यानुसार जायभाये यांच्या विशेष पथकाने पिंपळा धायगुडा येथे सापळा लावला.

दुपारी अडीच वाजता बोलेरो गाडी (एमएच ३१ डीव्ही ८३३१) दिसताच पोलिसांनी तिला अडविले. झडती घेतली असता गाडीत ६४ हजार रुपये किमतीचे ३२ किलो सुगंधित चंदन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी चंदन आणि बोलेरो असा एकूण ५ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून चालक तुषार प्रभाकर आंबाड (रा. इरिगेशन ऑफिसच्या पाठीमागे, केज) याला बेड्या ठोकल्या. केजचा माजी नगरसेवक बालाजी जाधव याच्या सांगण्यावरून आपण हे चंदन घाटनांदूर येथील अनोळखी व्यक्तीकडून घेतले आहे. ते बालाजी जाधव याच्या स्वाधीन करण्यासाठी केजला वापस जात होतो असे आंबाड याने पोलीस चौकशीत सांगितले. याप्रकरणी पो.ह. लक्ष्मण टोले यांच्या फिर्यादीवरून तुषार आंबाड, बालाजी जाधव, बोलेरो मालक समीरसाळुंके यांच्यावर कलम ३७९, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम कलम ४१,४२ आणि भारतीय वृक्षतोड अधिनियम कलम २६(फ) अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

 

Web Title: Sandalwood thieves caught by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.