शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संदीप क्षीरसागर जाणार बांधावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 12:06 AM2019-11-03T00:06:54+5:302019-11-03T00:07:24+5:30
संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी बीडचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर हे थेट बांधावर संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना घेऊन पाहणी करणार आहेत.
बीड : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बीड आणि शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी बीडचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर हे थेट बांधावर संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना घेऊन पाहणी करणार आहेत.
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात बाजरी, सोयाबीन, कापुस यासह अन्य पिके हातची गेली आहेत. सोयाबीन, बाजरीला कोंब फुटले आहेत. शेतकºयांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. पिकविमा भरलेल्या शेतक-यांना नुकसानीसंदर्भात अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित अधिकारी शेतक-यांना भेटत नाहीत. अशा अनेक तक्र ारी प्राप्त झाल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर यांनी तातडीची बैठक दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. तहसिल कार्यालय बीड येथे बोलावली आहे.
या बैठकीनंतर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तहसिलदार या सर्वांना सोबत घेत बीड मतदार संघातील नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकांची पाहणी व पंचनाम्यासाठी स्वत: आ. संदिप क्षीरसागर गावागावात जाणार आहेत. शेतक-यांना तातडीने पिकविमा जोपर्यंत मंजूर होत नाही. त्याचबरोबर ज्या शेतक-यांनी विमा भरला नाही, परंतू नुकसान झाले आहे. अशा शेतक-यांनाही ठोस मदत शासन स्तरावरुन होत नाही, तोपर्यंत या प्रश्नी पाठपुरावा करत राहु वेळ पडल्यास आक्र मक भूमिका घेण्याचा पवित्राही आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतला आहे.