अंबाजोगाईत पिंपळाचे झाड लावून जपल्या स्मृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:17 AM2018-01-08T01:17:26+5:302018-01-08T01:17:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : तालुक्यातील सोनवळा येथील जळीत प्रकरणातील प्रज्ञा सतीश मस्के या अल्पवयीन युवतीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील सोनवळा येथील जळीत प्रकरणातील प्रज्ञा सतीश मस्के या अल्पवयीन युवतीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कुटुंबियांनी तिच्या अस्थी स्मशानभूमीत पुरून त्यावर पिंपळाचे झाड लावले आहे. वृक्षाच्या रूपाने आमची मुलगी जिवंत राहील असे म्हणत त्यांनी पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला.
केवळ लग्नास नकार देण्याच्या क्षुल्लक कारणावरून २६ डिसेंबर २०१७ रोजी चौघांनी प्रज्ञाला रॉकेल ओतून पेटवून दिले होते. दहा दिवसानंतर शुक्रवारी (दि. ५ जानेवारी) तिने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ४ जानेवारी रोजी प्रज्ञाचा १८ वा वाढदिवस होता, परंतु त्यादिवशी तिची प्रकृती अतीचिंताजनक होती. दुर्दैवाने दुसºया दिवशीच तिचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी सोनवळा येथील स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी मस्के कुटुंबियांनी जुन्या रूढी परंपरांना फाटा देत स्मशानभूमीत खड्डा खोदून प्रज्ञाच्या अस्थी त्यात पुरल्या आणि त्यावर पिंपळोच झाड लावले. या वृक्षाची काळजी घेऊन प्रज्ञाच्या स्मृती कायम जतन करणार असल्याचे मस्के कुटुंबीयांनी सांगितले.