जनविकास महाविद्यालयात साठे जयंती, टिळक पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:55+5:302021-08-02T04:12:55+5:30
डॉ. कांबळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला चालना देणारे आहे. या साहित्यामुळे उपेक्षित दीनदुबळ्यांच्या अंतरंगाचा वेध ...
डॉ. कांबळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला चालना देणारे आहे. या साहित्यामुळे उपेक्षित दीनदुबळ्यांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. आजही विद्यार्थी संशोधक हे त्यांच्या साहित्यावर संशोधनात्मक अभ्यास करताना दिसून येतात. प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी लावणी आणि पोवाडा या आधारावर कथा शैलीच्या माध्यमातून जनतेमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. जनसमुदायाला रूढीवादी प्रणालींपासून वाचविण्यसाठी तसेच ब्रिटिश शासनाविरुद्ध त्यांनी विद्रोही साहित्याचे लिखाण केले. हे साहित्य आजही उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. संगीता मोरे यांनी केले. प्रा.डॉ. केशव तिडके यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्रा. प्रभाकर मेश्राम, गणेश गोरे, धायगुडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
010821\ashok dhaygude_img-20210801-wa0055_14.jpg