संविधान वाचवा! बीडमध्ये हजारो महिला उतरल्या रस्त्यावर
By संजय तिपाले | Published: September 15, 2022 01:25 PM2022-09-15T13:25:41+5:302022-09-15T13:26:16+5:30
मूकमोर्चाला सुरुवात: संविधान बचावच्या मागणीसाठी शहरासह जिल्हाभरात तालुक्याच्या ठिकाणी देखील मोर्चे निघणार आहेत.
बीड : अल्पसंख्याकांवरील वाढते हल्ले, गुजरात येथे एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची शिक्षा माफ केल्याच्या निषेधार्थ संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील मिल्लीया महाविद्यालय परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.
जिल्ह्यात संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसंदर्भात १५ सप्टेंबर रोजी मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार मिल्लिया महाविद्यालय परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. बलभीम चौक, कारंजा, राजुरी वेस, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. मोर्चात विद्यार्थिनी अग्रभागी असून महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. संरक्षणासाठी स्वयंसेवकांनी कडे तयार केले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.
फळे, पाण्याची व्यवस्था
संविधान बचावच्या मागणीसाठी शहरासह जिल्हाभरात तालुक्याच्या ठिकाणी देखील मोर्चे निघणार आहेत. बीडमध्ये मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पाणी व फळांची व्यवस्था केलेली आहे.