बीडमध्ये सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:19 AM2018-07-03T01:19:55+5:302018-07-03T01:20:29+5:30
अवैधरीत्या साठवून ठेवलेला २ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी बीड शहरात पेठबीड भागात केली. याप्रकरणी पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड : अवैधरीत्या साठवून ठेवलेला २ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी बीड शहरात पेठबीड भागात केली. याप्रकरणी पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुरेंद्र यशवंतराव काजळे (रा.भोईगल्ली) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरेंद्र हा मागील अनेक दिवसांपासून बाहेरील राज्यातून गुटखा आणून बीडमध्ये विक्री करीत होता. हीच माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने यांना मिळाली.
त्यांनी सोमवारी सापळा लावला. यावेळी भोईगल्लीतील त्याच्या गोडावूनवर धाड टाकली असता २ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्यानंतर पंचनामा केला. सुरेंद्र विरोधात पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोउपनि कैलास लहाने, पी.टी. चव्हाण, राहुल शिंदे, संजय चव्हाण, विजय पवार, महेश चव्हाण, जयराम उबे यांनी केली.