जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा; चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:45 AM2018-10-22T04:45:21+5:302018-10-22T04:45:44+5:30
जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये चार कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परळी व अंबाजोगाई तालुक्यातील कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून कृषी आयुक्तालयाने यासंबंधीचा अहवाल मागविला आहे.
परळी वैजनाथ (जि. बीड) : जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये चार कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परळी व अंबाजोगाई तालुक्यातील कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून कृषी आयुक्तालयाने यासंबंधीचा अहवाल मागविला आहे.
बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेवर ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पहिल्या टप्प्यात केलेल्या ८८३ कामांपैकी ३०७ कामांची तपासणी झाली असता, त्यात चार कोटीचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी २३ अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आणि कृषी खात्यामार्फत चौकशी सुरु आहे. हा घोटाळा उघडकीस येताच परळी तालुक्यातील नाथ्रा, इंजेगाव, पांगरी, लोणी, सेलु, भोपला, अस्वलंबा, नागपिंप्री, गाढेपिंपळगाव, कावळ्याचीवाडी, कौडगाव घोडा, कौडगाव हुडा, बोधेगाव, रामेवाडी, ममदापुर,
पौळ पिंपरी, हिवरा, सफदारबाद, रेवली, वाका या गावांतील
कामांच्या तपासणीचे आदेश दक्षता पथकाला देण्यात आले
आहेत.