बोंडअळी अनुदान वाटपामध्ये घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:22 PM2018-09-27T23:22:29+5:302018-09-27T23:23:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. अद्यापही अनेक गावे अनुदानापूसन वंचित आहेत. तसेच अनेक ठिकाणी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करत संबंधित तलाठी व अधिकाºयांविरोधात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. शेतकºयांना झालेल्या नुकसान भरपाईपोट पहिल्या टप्प्यात ६८ कोटी तर दुसºया टप्प्यात १०२ कोटी रुपये अनुदान देण्यात आले होते. या माध्यमातून जवळपास १ लाख ६२ हजार शेतकºयांपर्यंत अनुदान रक्कम वाटप करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ज्या व्यक्तींच्या नावे शेतीच नाही, किंवा ज्यांचे क्षेत्र कमी असून त्यांचे क्षेत्र कागदोपत्री जास्त दाखवून अनुदान लाटल्याचा गैरप्रकार समोर आला आहे.
अनुदान अद्यापही मिळाले नाही
खरीप हंगाम संपत आला, तरी देखील मागील वर्षीच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारे बोंडअळी अनुदान अजून मिळाले नाही. पाऊस नसल्यामुळे या हंगामातील पिके हातची गेली आहेत. या परिस्थितीमध्ये बोंडअळी अनुदान हा शेतकºयांसाठी आधार ठरणार होता. मात्र, रबी हंगाम आला तरी देखील मागील वर्षातील अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच शासनाकडून दिशाभूल होत असल्याचे नेकनूर परिसरातील अंधापुरी येथील शेतकरी काना टेकडे यांनी सांगीतले.
असा झाला घोटाळा
बीड तालुक्यातील रामगांव, नाथापूर, लोणी, शहजानपूर सह इतर गांवातील अनेक शेतकºयांची नावे एकापेक्षा जास्त अनुदान यादीमध्ये टाकण्यात आली आहेत. एक खाते क्रमांक अनेकांना देण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा सहकारी बँके च्या माध्यमातून अनुदान उचलण्यात आलेले आहे.
८/अ च्या उताºयानुसार क्षेत्र कमी असताना देखील काही गुंठ्यांमध्ये ते वाढवण्यात आले आहे.
हा प्रकार लपवण्यासाठी ज्या शेतकºयांचे क्षेत्र जास्त आहे, त्यांचे कापूस लागवडीखालील क्षेत्रांमध्ये घट करण्यात आली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रफळ असणाºयाला जास्त फायदा आणि जास्त क्षेत्र असणारे अनुदानापासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
त्याचसोबत जे भूमिहीन असणाºयांच्या नावे देखील शेती असल्याचे दाखवण्यात आलेली आहे. याची संपूर्ण माहिती प्रशासनास देण्यात आल्याचे संबंधित गावांमधील शेतकºयांनी सांगितले.
तसेच असा प्रकार सगळ््या जिल्हायात झाल्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे दोन टप्प्यात वाटप केलेल्या बोंडअळी अनुदानाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.