मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:59+5:302021-06-10T04:22:59+5:30

आष्टी : बी.सी.ए.,बी.बी.ए. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील ओबीसीसह मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे वाटप शासनाने थांबविले आहे, तरी शिष्यवृत्ती ...

Scholarships should be distributed to backward class students | मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करावे

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करावे

Next

आष्टी : बी.सी.ए.,बी.बी.ए. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील ओबीसीसह मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे वाटप शासनाने थांबविले आहे, तरी शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड थांबवावी, अशी मागणी भाजपाच्या भटके विमुक्त विभागाच्या युवती प्रदेशाध्यक्षा ॲड. भाग्यश्री ढाकणे यांनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सदरील अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी सुरळीतपणे शिष्यवृत्ती देण्यात येत होती. यावर्षी मात्र अचानकपणे शिष्यवृत्ती थांबविण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय झाला आहे. शासनाने झेड वर्ग दर्जात समाविष्ट केलेल्या या अभ्यासक्रमांमुळे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ध्यावर शिक्षण सोडून देण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे शासनाने सदरील मागणीचा फेरविचार करून पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत शिष्यवृत्ती सुरू ठेवण्याची मागणीदेखील ॲड. ढाकणे यांनी निवेदनात केली आहे.

Web Title: Scholarships should be distributed to backward class students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.