५० लाख खर्च करून गायकवाड बंधंूनी सुकळीत बांधली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:17 AM2019-06-17T00:17:50+5:302019-06-17T00:18:20+5:30
सुकळी येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात गुत्तेदारीचा व्यवसाय करत असलेले बिभीषण गायकवाड व बाळासाहेब गायकवाड या दोघा बंधूनी सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची देणगी दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात गुत्तेदारीचा व्यवसाय करत असलेले बिभीषण गायकवाड व बाळासाहेब गायकवाड या दोघा बंधूनी सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची देणगी दिली असून, त्यातून या शाळेची अत्याधुनिक व सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. शाळा भरण्याच्या पहिल्या दिवशी तिचे लोकार्पण होणार आहे.
सोमवारपासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एका विशेष गावात जाऊन शिक्षण सभापती मुक्काम करतात. गावातील नागरिक, पालक यांच्याशी चर्चा करून सकाळी विद्यार्थ्यांना गुलाब फुल, गणवेश, वही- पेन, देऊन स्वागत करतात. सभापती राजेसाहेब देशमुख यांनी यावर्षी केज तालुक्यातील सुकळी या गावाची निवड केली आहे. सकाळी गावात स्वत: फेरी काढून पहिल्याच दिवशी शाळेत शंभर टक्के उपस्थिती असावी असा संदेश देणार आहेत. यावेळी वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.देशमुख यांच्यासह, शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, केंद्रप्रमुख, शिक्षण विभागामधील सर्व टीमने रविवारी शाळेत मुक्काम केला.