शाळा बंद, कार्यालयांचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:51 PM2019-09-09T23:51:26+5:302019-09-09T23:52:08+5:30
बीड : जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी धोरण बंद करावे, प्रसुती रजा वाढवाव्या, शिक्षकांना अवांतर कामे देऊ नयेत,वेतन ...
बीड : जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी धोरण बंद करावे, प्रसुती रजा वाढवाव्या, शिक्षकांना अवांतर कामे देऊ नयेत,वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे सोमवारी जिल्ह्यातील शाळांना अघोषित सुटी राहिली. तर सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची कामे खोळंबली. जिल्ह्यात २० हजारपेक्षा जास्त शिक्षक, कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.
माजलगावात आंदोलन
शिक्षकांच्या संपामुळे माजलगाव तालुक्यातील शाळा बंद होत्या. तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे व गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांना निवेदन दिले. यावेळी पुरु ष शिक्षकांबरोबरच महिला शिक्षिका व इतर विविध विभाागत काम करणाऱ्या महिला तसेच तालुक्यातील शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध संघटनांच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
धारुर तालुक्यात कडकडीत बंद
धारुर तालुक्यातशिक्षकांच्या संपामुळे शाळा बंद होत्या तर कर्मचाºयांच्या संपामुळे कार्यालयात शुकशुकाट होता. येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत एकत्र आलेल्या शिक्षक, कर्मचाºयांनी गटशिक्षणाधिकाºयांना निवेदन दिले. त्यानंतर पंचायत समितीसह तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून घोषणा देत सरकारी धोरणांचा विरोध केला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वडवणीत प्रशासनाला निवेदन
वडवणी तालुक्यात झालेल्या आंदोलनात सोमवारी संपकरी शिक्षक व कर्मचाºयांनी तहसील व पंचायत समिती प्रशासनाला लेखी निवेदन दिले. या संपामध्ये नीलेश चव्हाण, बाप्पू धन्वे, अंगद मुंडे, सुंदर डोंगरे, संतोष घोडेराव, झुंबर गव्हाणे, पंजाबराव देशमुख, शेख जलील, रोहिदास चव्हाण, श्रीकृष्ण उंडाळे, कमलाकर खंदारे, तुकाराम राठोड, परमेश्वर बिडवे, संतोष सावंतसह शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले.
....तर ११ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन
संपात जिल्ह्यातील शिक्षक तसेच महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, कृषी, पशूसंवर्धन, आरोग्य व इतर सरकारी, निमसरकारी कर्मचाºयांच्या ३८ संघटनांनी सहभाग घेतला.
९० टक्के शाळा बंद होत्या. काही शाळांमध्ये शिक्षक आले परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी होती. तसेच कार्यालयांमध्ये कामकाज झाले नाही.
भगवान पवार, राजेंद्र खेडकर, सुनील कुर्लेकर, विजयकुमार समुद्रे, विष्णू आडे आदींसह समन्वय समितीचे पदाधिकाºयांनी तहसीलदार व जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदन देणारे, घेणारे संपावर
शिरूर तालुक्यातील शिक्षकांनी शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. निवेदन घेणारे तहसीलचे कर्मचारी संपावर असल्याचा अनुभव यावेळी आला.
यावेळी दिलीप जायभाये, विठ्ठल जाधव, अविनाश गाडेकर, अप्पासाहेब शिंदे, विकास खेडकर, कैलास तुपे , सुनिल खेडकर, संतोष रंध्वे, बाळासाहेब सिरसाट, भागवत सिरसाट, बाला कुरूडे, नितीन कैतके, बप्पा मोरे, रमेश सिरसाट,शिवलिंग परळकर, गोरख मिसाळ,कन्नालाल खामकर, सुभाष सानप,अप्पा तांबे, शहादेव मुळे,श्रीकांत देवढे, राजेंद्र जाधवसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होते.