यूडायस, सरलची माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शिक्षण विभागाने दिली तंबी

By अनिल भंडारी | Published: June 17, 2023 06:51 PM2023-06-17T18:51:06+5:302023-06-17T18:51:41+5:30

यूडायस प्लस व सरलमधील विद्यार्थी भरणे आधार वैध करणेबाबत स्वयंअर्थसाहाय्यित आणि समाजकल्याण विभागाच्या शाळा प्रमुखांची बैठक घेण्यात आली.

Schools that do not fill in the details of Udias, Saral will be de-accredited, Education Department said | यूडायस, सरलची माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शिक्षण विभागाने दिली तंबी

यूडायस, सरलची माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शिक्षण विभागाने दिली तंबी

googlenewsNext

बीड : यूडायस आणि सरल पोर्टलवर विद्यार्थी आधार वैध करण्यासाठी लागणारी माहिती वेळेत न भरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालक आणि समाजकल्याण आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचा इशारा स्वयंअर्थसाहाय्यित आणि समाजकल्याण विभागाच्या शाळा प्रमुखांना देण्यात आला.

यूडायस प्लस व सरलमधील विद्यार्थी भरणे आधार वैध करणेबाबत स्वयंअर्थसाहाय्यित आणि समाजकल्याण विभागाच्या शाळा प्रमुखांची बैठक घेण्यात आली. शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, समग्र शिक्षाचे उपशिक्षणाधिकारी अजय बहिर, उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, मोहन काकडे, विस्तार अधिकारी ऋषीकेश शेळके आदी यावेळी उपस्थित होते.

संगणक प्रोग्रामर सुरेंद्र रणदिवे व अविनाश गजरे यांनी यूडायसबाबत व सरलबाबत शाळानिहाय आढावा घेतला व येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवून मार्गदर्शन केले. याप्रसंगी आधार वैध करणे व विद्यार्थ्यांची माहिती भरणे हे शाळांना किती अनिवार्य आहे तसेच ही माहिती न भरल्यास त्याचे काय दुष्परिणामांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती दिली.

Web Title: Schools that do not fill in the details of Udias, Saral will be de-accredited, Education Department said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.