शिवभोजन थाळी देऊन किराणा दुकान सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:36+5:302021-04-19T04:30:36+5:30

परळी : शहरातील स्टेशन रोडवरील डुबे किराणा स्टोअर्सच्या चालकाने रविवारी कोरोना पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडॉऊन असताना ...

Seal the grocery store with a Shivbhojan plate | शिवभोजन थाळी देऊन किराणा दुकान सील

शिवभोजन थाळी देऊन किराणा दुकान सील

Next

परळी : शहरातील स्टेशन रोडवरील डुबे किराणा स्टोअर्सच्या चालकाने रविवारी कोरोना पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडॉऊन असताना दुकान उघडले म्हणून प्रशासनाच्या वतीने शिवभोजन थाळी देऊन त्यांचे किराणा दुकान सील करण्यात आले. ही कारवाई तहसीलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांनी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. शहरात कालपासून सर्व दुकाने बंद होती. पोलिसांचा रूट मार्चही झाला होता. रविवारी तहसीलदार सुरेश शेजूळ व नायब तहसीलदार बाबूराव रूपनर हे शहरात पाहणी करीत असताना त्यांना स्टेशन रोडवरील डुबे किराणा स्टोअर्स हे दुकान उघडे दिसले. त्यामुळे या दुकानास सील करून गांधीगिरी करीत दुकान चालकास शिवभोजन थाळी दिली. शहरात आता कडक अंमलबजावणी करणे सुरू झाले आहे.

परळीत दुकान उघडे ठेवल्याने दुकानदारास शिवभोजन देत तहसील प्रशासनाने कारवाई केली.

===Photopath===

180421\img-20210418-wa0222_14.jpg

Web Title: Seal the grocery store with a Shivbhojan plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.