बीडमध्ये ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांचे ‘सर्च आॅपरेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:13 AM2019-03-17T00:13:39+5:302019-03-17T00:14:34+5:30

जिल्ह्यात पाहिजे, फरारी असलेल्या गुन्हेगारांची संख्या १५७२ एवढी आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या सर्व ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांना तात्काळ गजाआड करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले आहेत.

Search Operation of 'Wanted' criminals in Beed | बीडमध्ये ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांचे ‘सर्च आॅपरेशन’

बीडमध्ये ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांचे ‘सर्च आॅपरेशन’

Next
ठळक मुद्दे१३ दिवसांत ३८ जण गजाआड : पोलीस अधीक्षकांच्या ठाणेदारांना सक्त सूचना

बीड : जिल्ह्यात पाहिजे, फरारी असलेल्या गुन्हेगारांची संख्या १५७२ एवढी आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या सर्व ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांना तात्काळ गजाआड करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले आहेत. यासाठी विशेष पथकही नियूक्त केले आहे. मागील १३ दिवसांत तब्बल ३८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. राहिलेल्या गुन्हेगारांचे ‘सर्च आॅपरेशन’ बीड पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनही कारवाया करु लागले आहेत. पोलीस दलही कामाला लागल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये १५७२ आरोपी पोलिसांना हवे आहेत.
त्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक विभागाच्या अनुभवी कर्मचाऱ्यांचे विशेष पथक अधीक्षकांनी नियुक्त केले आहे.
या पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. शिवाय संबंधित ठाण्यांनाही सक्त आदेश दिले असून, सर्व वॉन्टेड गुन्हेगारांना गजाआड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बीड शहर ठाणे आघाडीवर
जिल्ह्यात २८ ठाण्यांपैकी बीड शहर ठाणे हद्दीत सर्वाधिक ३०१ गुन्हेगार वॉन्टेड आहेत. गेवराई १२६, आष्टी १२५, केज ११४, बीड ग्रामीण ६७, पेठ बीड ६३, शिवाजीनगर ५९, पिंपळनेर २५, तलवाडा २४, चकलांबा ५७, पाटोदा ५३, शिरुर ३६, अंभोरा १७, अंमळनेर १६, अंबाजोगाई शहर ४४, अंबाजोगाई ग्रामीण ३१, परळी शहर ६०, परळी ग्रामीण २७, संभाजीनगर १७, बर्दापूर १४, माजलगाव शहर ७२, माजलगाव ग्रामीण २९, दिंद्रूड १५, वडवणी २५, सिरसाळा १८, धारुर ३५, नेकनूर ७५, युसूफवडगाव २७ असे १५७२ आरोपी पोलिसांना पाहिजे आहेत. मार्च महिन्यात ३८ आरोपींना अटक केली आहे. कलम ८२ नुसार हे आरोपी पोलिसांना हवे आहेत.
शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात वॉन्टेड गुन्हेगाराच्या माहिती संदर्भात बैठक घेण्यात आली. यामध्ये ठाणेनिहाय आढावा घेतला, शिवाय केलेल्या कारवायांचीही माहिती घेतली. १५७२ आरोपी पाहिजे असून, १३१ आरोपी फरारीमध्ये आहेत. यामध्ये २ ते ३ वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून काही आरोपी पोलिसांना गुंगारा देत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या सर्वांची माहिती घेणे सुरू असल्याचे समजते.

Web Title: Search Operation of 'Wanted' criminals in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.