जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही विनामास्क विरोधी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:40+5:302021-02-23T04:50:40+5:30
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाकडून आता कडक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी प्रत्येकाला मास्क वापरण्याचे ...
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाकडून आता कडक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी प्रत्येकाला मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या आवाहनाकडे काही लोक दुर्लक्ष करतात, हाच धागा पकडून बीड नगरपालिका विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया करीत आहे. शनिवारी ५५ लोकांवर कारवाई करून १८ हजार रुपयांचा दंड वसूल केल्यानंतर रविवारीही कारवायांची ही मोहीम सुरूच होती. दिवसभरात ४८ लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून नऊ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी ही माहिती दिली. तसेच कोणीही विनामास्क बाहेर पडू नये, कोरोना नियमांचे पालन करून काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉ. गुट्टे यांनी केले.