दुसऱ्या लाटेत तब्बल १९० कोरोनाबळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:17+5:302021-04-23T04:36:17+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. पहिल्या लाटेत ६०२ लोकांचा जीव घेतल्यानंतर दुसऱ्या लाटेत ५ ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. पहिल्या लाटेत ६०२ लोकांचा जीव घेतल्यानंतर दुसऱ्या लाटेत ५ मार्चपासून आतापर्यंत १९० लोकांचा बळी गेला आहे. उपचारात दिरंगाई, रूग्णालयात उशिरा दाखल होणे, कोमॉर्बिड आजार आदी कारणे या मृत्यूस कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी अवघ्या दीड महिन्यात १९० मृत्यू होणे हे अतिशय चिंताजनक आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य सुविधाही मृत्यू होण्यास कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात जवळपास १३०० पेक्षा जास्त गावे आहेत. पैकी १६२ गावे आजही कोरोनामुक्त आहेत. असे असले तरी दुसऱ्या लाटेत रूग्णसंख्या गतीने वाढत आहे. रोज हजारापेक्षा जास्त नवे रूग्ण आढळत असून मृत्यूही वाढत आहेत. जिल्ह्यात चौसाळा, नागापूर, कडा, आंधळेवाडी, जामगाव, युसूफवडगाव, आडस,मस्साजोग, बोरी सावरगाव, पिपंरखेड, पिंपळा, आसरडोह, मैंदवाडी, आवरगाव, थेरला, सुप्पा, सांगळेवाडी, डोकेवाडी, नागापूर(ता.परळी), खेर्डा, कोल्हेर, गढी, तलवाडा, उमापूर, जातेगाव, मोरेवाडी, मुडेगाव, शेपवाडी, वांगी, दिंद्रूड, चोपणवाडी या गावांमध्ये सार्वाधिक कोरोना रूग्ण आढळल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. तर मृत्यू हे बीड व अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक आहेत.
ऑक्सीजनसाठी प्रशासनाची धावपळ
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारे लिक्विडही उपलब्ध होत नाही. पुणे, औरंगाबाद आणि लातूरला प्रशासनाकडून संपर्क केला जात आहे. रोज जवळपास अडीच कोटी लिटर ऑक्सिजनची मागणी जिल्हाभरातून होत आहे.
ऑक्सिजन खाटांसाठी प्रतीक्षा
जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन खाटांची संख्या भरपूर असली तरी वाढत्या रूग्णसंख्येच्या तुलनेत या खाटा अपुऱ्या पडत आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना खाटांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अशी परिस्थिती व्हेंटीलेटरसाठीही आहे. आयसी १ व आणि २ मध्ये जागा मिळविण्यासाठी रूग्णांना धावपळ करावी लागत आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे.
रूग्ण वाचविण्यासाठी प्रशासनाची धडपड
आरोग्य सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. आरोग्य संस्थेत आलेला प्रत्येक रूग्ण हा ठणठणीत होऊन घरी परतावा, अशी अपेक्षा असते. त्यासाठी आमची यंत्रणा पूर्ण प्रयत्न करीत आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याने चिंता आहे. याचे ऑडीट करण्यासह उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण भागात हाल होणार नाहीत, यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेला सूचना केलेल्या आहेत.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
----
तालुका
एकूण रूग्ण
सर्वधिक रूग्ण असलेले गाव
तालुक्यातील ॲक्टीव्ह रूग्णसंख्या
कोरोनामुक्त गावे
बीड
११८०२
चौसाळा
२०१५
१४
अंबाजोगाई
७६०७
मोरेवाडी
१७१८
९
गेवराई
२४३८
खेर्डा
५९१
४१
माजलगाव
२९११
वांगी
४९८
५
धारूर
१५५१
आसरडोह
२४३
३६
केज
३२३५
युसूफवडगाव
८५२
४
आष्टी
४७५७
कडा
१३१०
८
वडवणी
१०७७
पिंपरखेड
१२६
१२
पाटोदा
१६१२
थेरला
४७३
१
शिरूर कासार
१४५२
सांगळेवाडी
२३८
२
परळी
४०६३
नागापूर
७८६
३१
----
ऑक्सीजन बेड्सची मारामार
तालुका एकूण कोरोना सेंटर एकूण बेड्स ऑक्सीजन बेड्स
बीड ३४ २५९१ ९०८
अंबाजोगाई १४ १६५३ ९७४
गेवराई७ ४५६ ८८
माजलगाव ११ ८९० १६५
धारूर३ ३२० ०
केज६ ५६४ ४३
आष्टी९ ८१५ १६६
वडवणी४ २४० ०
पाटोदा६ ४१२ २४
शिरूर कासार३ १७५ २९
परळी १३ ५७० १५३
---