पाहणी दौऱ्याकडे विधिमंडळ समिती सदस्यांसह सचिवांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:53 AM2018-08-31T00:53:23+5:302018-08-31T00:55:35+5:30
विधिमंडळ अंदाज समिती प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा दौºयावर आली होती. मात्र, या पाहणी दौºयाकडे विधिमंडळ सदस्यांसह सचिवांनी देखील पाठ फिरवली. या समितीमध्ये २७ आमदारांचा चमू व १० विविध विभागाचे सचिव येणार होते. परंतु प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी फक्त ९ आमदार व २ सहसचिवांनी हजेरी लावली.
बीड : विधिमंडळ अंदाज समिती प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर आली होती. मात्र, या पाहणी दौ-याकडे विधिमंडळ सदस्यांसह सचिवांनी देखील पाठ फिरवली. या समितीमध्ये २७ आमदारांचा चमू व १० विविध विभागाचे सचिव येणार होते. परंतु प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी फक्त ९ आमदार व २ सहसचिवांनी हजेरी लावली.
जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा व विविध विभागातील कामांना भेटी देण्यासाठी विधिमंडळ सदस्य समिती जिल्हा दौ-यावर आहे. समितीच्या नियोजित शासकीय कार्यक्रमाची रुपरेषा प्रशासनाने ठरवली होती. सकाळी ९ वाजेपासून कार्यक्रमास सुरुवात होणार होती. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी देखील केली होती. सकाळी ११ वाजता विधिमंडळ सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह व इतर प्रमुख अधिकाºयांनी सदस्यांचे स्वागत केले.
सर्व विभागातील प्रमुख अधिकाºयांनी राबवलेल्या योजनांबद्दल उपस्थित सदस्यांना माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय अधिकाºयांची संख्या कमी असूनही जिल्ह्यात विविध योजना योग्य पद्धतीने राबवल्याचे सांगितले. त्यानंतर सदस्यांची दोन पथके जिल्हा दौºयावर रवाना झाली.
आष्टी तालुक्यातील कामांची पाहणी करण्यासाठी आ. विजय वडेट्टिवार, राजेश काशीवार, कृष्णा गजबे, कृष्णा खोपडे, विजय रागडहाले या सदस्यांचे पथक रवाना झाले. दुसरीकडे परळी कामांच्या पाहणीसाठी आ. अनिल कदम, रमेश बुंदेले डॉ.संजय रायमुलकर, वसंतराव चव्हाण यांचे पथक गेले होते. पाहणीनंतर कामांसंदर्भात पथकातील सदस्यांनी अधिका-यांसमवेत चर्चा केली.
पथकाला आघाडीचे निवेदन
बीड नगर पालिकेच्या कामासंदर्भात काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी विधिमंडळ अंदाज समितीला निवेदन दिले. निवेदन पाहून समिती सदस्यांनी चर्चा केली.
आष्टीत अधिका-यांना धरले धारेवर
आष्टी येथे चार सदस्यांनी नगरपंचायतमध्ये अधिकाºयांची चौकशी केली. खडकत येथील सिमेंट रस्ता, जामगाव येथील दलित वस्ती स्मशानभूमी तसेच नगरपंचायतच्या विविध कामांचा आढावा घेत अधिका-यांना धारेवर धरले.
समितीने न.पं.च्या तत्कालीन व विद्यमान मुख्याधिकाºयांच्या कामांची चौकशी केली. विचारलेल्या प्रश्नांदरम्यान उत्तरे देताना मुख्याधिकारी गोंधळलेल्या दिसून आल्या. आंधळेवाडी, पोखरी येथील रस्ता पाहणी केली.
उप विभागीय अधिकारी गणेश नि-हाळी, तहसीलदार रामेश्वर गोरे, ना. त. सुभाष कट्टे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी होते.
या सदस्यांनी मारली दांडी
धनंजय गाळगीळ, उन्मेष पाटील, देवयानी फरांदे, प्रकाश आबीटकर, प्रताप पाटील-चिखलीकर, कुणाल पाटील, दादासाहेब मुरकुटे, आकाश फुंडकर, सुनिल प्रभू, शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, प्रदीप जाधव, धैर्यशील पाटील, अबू आझमी, डॉ. नीलम गोºहे, राहुल नार्वेकर, सुजितसिंह ठाकूर, अनिल गाडगीळ हे विधिमंडळ समिती सदस्यांसह सचिव गैरहजर होते.