बिबट्याला पाहताच शेतमजुरांनी ठोकली धूम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 07:58 PM2021-01-01T19:58:25+5:302021-01-01T19:59:54+5:30

Leopard News या घटनेने सावध झालेले प्रशासन हा प्राणी बिबट्याच आहे का, याचा शोध घेत आहे.

Seeing the leopard, the farmers run from land in Beed | बिबट्याला पाहताच शेतमजुरांनी ठोकली धूम 

बिबट्याला पाहताच शेतमजुरांनी ठोकली धूम 

Next
ठळक मुद्देएक महिन्यापूर्वी सावरगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते.

माजलगाव (जि. बीड) : शहरालगत असलेल्या मनूर शिवारात शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांनी गावात धूम ठोकली. या घटनेने सावध झालेले प्रशासन हा प्राणी बिबट्याच आहे का, याचा शोध घेत आहे.

एक महिन्यापूर्वी सावरगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. तेव्हापासून लोक दहशतीत होते. काही दिवसानंतर तेथे तडस असल्याचे वनविभागाने सांगितले. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी शहरापासून ५ किमी अंतरावर फुले पिंपळगाव शिवारात नवीन मोंढा व टीएमसी केंद्र परिसरात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते कल्याण गुंजकर हे आपल्या मित्रासह बीडहून माजलगावकडे येताना त्यांना बिबट्या जात असल्याचे दिसून आले. आता शुक्रवारी भरदिवसा सकाळी ११च्या सुमारास बिबट्या दिसल्याने मनूर परिसरात खळबळ उडाली. याबाबत प्रशासनाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून, पायाचे ठसे अस्पष्ट दिसत असल्याने अद्याप तो प्राणी कोणता, याचा शोध लागलेला नाही.

Web Title: Seeing the leopard, the farmers run from land in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.