जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी २२ शिक्षकांची निवड जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:40+5:302021-09-17T04:40:40+5:30

बीड : नाही..हो..म्हणता म्हणता अखेर जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आयुक्तांच्या परवानगीनंतर १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिदिनाचा मुहूर्त निश्चित झाला. ...

Selection of 22 teachers announced for District Teacher Award | जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी २२ शिक्षकांची निवड जाहीर

जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी २२ शिक्षकांची निवड जाहीर

Next

बीड : नाही..हो..म्हणता म्हणता अखेर जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आयुक्तांच्या परवानगीनंतर १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिदिनाचा मुहूर्त निश्चित झाला. गुरुवारी दुपारनंतर या कार्यक्रमाचे नियोजन करताना धांदल उडाली. जिल्हास्तरावरील निवड समितीने २०२१-२२ या वर्षासाठी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड केलेल्या प्रस्तावास आयुक्तांनी १५ सप्टेंबर रोजी मान्यता दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात तसेच त्या अनुषंगाने राज्य शासन केंद्र शासनाच्या आदेशाचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक विभागातून ११, माध्यमिक १० व १ विशेष अशा एकूण २२ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष शिवकन्या सिरसाट तर प्रमुख अतिथी म्हणून खा. डॉ. प्रीतम मुंडे तसेच सर्व आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओ, सर्व सभापती उपस्थित राहणार आहेत. जि. प.चे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती बजरंग सोनवणे हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असून, उपस्थित राहण्याचे अवाहन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी (प्रा.) व डॉ. विक्रम सारूक (मा.) यांनी केले आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

निवड झालेले प्राथमिक शिक्षक

भारती अनिता हरिश्चंद्र, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पूस, ता. अंबाजोगाई, झिंजुर्के आप्पा विठोबा, पिंपरी घाट, ता. आष्टी, शेख मुनव्वर सुलताना मोहम्मद युसुफ, रोशनपुरा, ता.बीड, तानाजी पुंडलिक लासुने, सोनीमोहा, ता. धारूर, गंगाराम देवीदास शिंदे, मिरकाळा, ता. गेवराई, ज्योती रंगनाथ शिंदे, तांबवा, ता. केज, पठाण ताहेर खान इब्राहिम खान, मंगरूळ, ता. माजलगाव, अंकुश माणिकराव फड, इंदपवाडी, परळी, अशोक बापूराव पवार, कोतन ता. पाटोदा, मंगल बापूराव नागरे, रायमोहा, ता. शिरुर कासार, हरिदास रावसाहेब सोळंके, भोटी नाईक तांडा, ता. वडवणी,

माध्यमिक शिक्षक

चंद्रकांत नारायण कवडे, डिघोळ आंबा, ता. अंबाजोगाई, सतीश त्रिंबकराव दळवी, ता. आष्टी, पोपट भीमराव गोसावी, चौसाळा, ता. बीड, शंकर लिमन इंगळे, ता. धारूर, लहू लक्ष्मण चव्हाण धोंडराई, ता. गेवराई, महादेव वसंतराव क्षीरसागर, भाटुंबा, ता. केज, पांडुरंग जेमा राठोड, ता. माजलगाव, अनिता बालाजी गर्जे, ता. परळी, बबन रामकिसन घायाळ डोंगरकिन्ही, ता. पाटोदा, प्रताप दत्तात्रय काळे, खोकरमोहा, ता. शिरूर कासार.

विशेष शिक्षकातून मंगल पांडुरंग समुद्रे, ता. माजलगाव यांची पुरस्कारासाठी निवड झाली. माजलगाव माजलगाव.

Web Title: Selection of 22 teachers announced for District Teacher Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.