बचत गट महिलांना रोजगारासाठी नगरपालिका गाळे उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:41+5:302021-08-21T04:38:41+5:30

बीड : शहरातील भाजी मंडईतील अहिल्याबाई होळकर सभागृह येथे महिला बचत गट मॉल येथे महिलांना रोजगारासाठी गाळे उभारण्यात येणार ...

Self help groups will set up municipal slums for employment of women | बचत गट महिलांना रोजगारासाठी नगरपालिका गाळे उभारणार

बचत गट महिलांना रोजगारासाठी नगरपालिका गाळे उभारणार

Next

बीड : शहरातील भाजी मंडईतील अहिल्याबाई होळकर सभागृह येथे महिला बचत गट मॉल येथे महिलांना रोजगारासाठी गाळे उभारण्यात येणार असून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते गाळे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

महिला बचत गटातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शहरातील भाजी मंडईतील अहिल्याबाई होळकर सभागृह येथे महिला बचत गट मॉल येथे गाळे उभारण्यात येणार आहेत. जेणेकरून महिलांना रोजगाराच्या माध्यमातून स्वतः च्या पायावर उभे राहून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. बीड नगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी कायमस्वरूपी स्टॉल उभारण्यात येणार असून कमीत कमी दरांमध्ये हे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, महिलांनी जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या उत्पादनाची निर्मिती करावी, जेणेकरून मराठवाड्याच्या बाहेर माल निर्यात करता येईल. महाराष्ट्रातील महिला बचत गटाचा पहिला मॉल आपण बीड शहरात सुरू केला. आर्थिकदृष्ट्या, गोरगरीब महिलांना रोजगारासाठी कमी दरात गाळे दिले जाणार आहेत. यावेळी बचत गटातील महिलांनी नगराध्यक्षांना राख्या बांधल्या.

याप्रसंगी डॉ. इलियास खान, हमीद चाऊस, ईश्वर धनवे, शारेख जकेरिया, किस्किंदा पांचाळ, शेख आयेशा, सुदेशना सरवदे, महमुदा शेख, कविता डोईफोडे, प्रिया बनसोडे, कल्पना सोनवणे, सीमा उडान, संगीता सांगोळे यांच्यासह महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिनी परदेशी, सूत्रसंचालन ललिता तांबारे तर आभार प्रदर्शन राजू वंजारे यांनी केले.

200821\20bed_16_20082021_14.jpg

नगराध्यक्षांच्या हस्ते बीड येथील अहिल्याबाई होळकर सभागृह येथे भूमिपूजन करण्यात आले. या मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर.

Web Title: Self help groups will set up municipal slums for employment of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.