फुगे विकून घर हेरायचे आणि रात्रीच्यावेळी घरफोडी करायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:31 AM2018-01-19T00:31:23+5:302018-01-19T00:31:53+5:30
परळी शहरातील कन्हेरवाडी रोडवर असलेल्या शंकर पार्वती नगरमध्ये बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक आर.डी.नाकाडे यांच्या घरी झालेली चोरी ही पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपसातून समोर आले आहे. दिवसभर फुगे विकून घर हेरायचे आणि रात्रीच्यावेळी घरफोडी करायची, असे नियोजन चोरांचे असायचे. अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून तपास लावण्याचे मोठे आव्हान आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : परळी शहरातील कन्हेरवाडी रोडवर असलेल्या शंकर पार्वती नगरमध्ये बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक आर.डी.नाकाडे यांच्या घरी झालेली चोरी ही पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपसातून समोर आले आहे. दिवसभर फुगे विकून घर हेरायचे आणि रात्रीच्यावेळी घरफोडी करायची, असे नियोजन चोरांचे असायचे. अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून तपास लावण्याचे मोठे आव्हान आहे.
ऐन मकरसंक्रांतीच्या सणातच परळी शहरात बँक व्यवस्थापक नाकाडे व भक्ताराम मुंडे यांच्या घरी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दोन्ही चोºयांमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. नाकाडे यांच्या घरी चोरी करणारी टोळी ही मध्यप्रदेशची तर मुंडे यांच्या घर फोडणारी टोळी ही परभणी जिल्ह्यातील असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. दोन्ही घटनांमध्ये चार-चार लोक होते. परभणीच्या टोळीतील दोघे तर मध्यप्रदेशच्या टोळीतील एकजण ताब्यात घेतला होता. परभणीची टोळी ही रेकॉर्डवरील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहायक अधीक्षक विशाल आनंद हे यावर लक्ष ठेवून आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर यांच्याकडूनही या टोळ्यांचा शोध घेतला जात आहेत. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडूनही तपासाचा पाठपुरावा केला जात आहे.
तपासासाठी परळी पोलिसांची पथके नियुक्त
मध्यप्रदेशची टोळी ही रेल्वे स्थानकावर जास्त असते. येथे पाकिटमारी करतात. तर काही लोक फुगे विकण्याच्या बहाण्याने शहरभर फिरतात आणि ज्या घरात कमी लोक आहेत किंवा घर बंद आहे, असे घर हेरतात. रात्रीच्यावेळी टोळी करून त्याला फोडून ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे. या चोरींचा तपास अद्याप तरी पूर्ण झालेला नसला तरी तपासासाठी परळी पोलिसांनी पथके नियूक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.