चोरीच्या दुचाकी विकून पुणे, मुंबईत दोघे करायचे ‘ऐश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:26 AM2019-01-25T00:26:52+5:302019-01-25T00:27:06+5:30

बीड, लातूर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या पुण्यात नेवून विक्री करायच्या. मिळालेल्या पैशांवर मग पुणे, मुंबईमध्ये जाऊन ऐश करायची. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा खेळ पोलिसांनी बंद पाडला आहे

By selling the stolen two wheel, | चोरीच्या दुचाकी विकून पुणे, मुंबईत दोघे करायचे ‘ऐश’

चोरीच्या दुचाकी विकून पुणे, मुंबईत दोघे करायचे ‘ऐश’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड, लातूर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या पुण्यात नेवून विक्री करायच्या. मिळालेल्या पैशांवर मग पुणे, मुंबईमध्ये जाऊन ऐश करायची. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा खेळ पोलिसांनी बंद पाडला आहे. दोन अट्टल दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने संयुक्तरीत्या केली.
सुशांत रामनाथ मुंडे (२१, रा. साळींबा, ता. वडवणी) व महेश (अल्पवयीन असल्याने नाव बदलले) अशी पकडलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत. टोळीचा म्होरक्या व अन्य एकजण अद्यापही फरार आहे. गत दोन महिन्यांपासून त्यांनी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता.
दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपास गतीने सुरू केला. पो. नि. घनश्याम पाळवदे यांना हे चोरटे केज तालुक्यात असल्याचे समजले. त्यांनी सपोनि अमोल धस आणि पोउपनि आर. ए. सागडे यांना आदेश देत तपासाला पाठविले. त्यांनीही दोन चोरट्यांना केज-धारूर रोडवर पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करणार असून, जवळपास ७ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि आर. ए. सागडे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल धस, गलधर, बालाजी दराडे, गणेश दुधाळ, सखाराम पवार, साजीद पठाण, राजू वंजारे, हराळ, पांडुरंग देवकते, गणेश नवले, अंकुश वरपे, रेवणनाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली आहे.
१५ गुन्हे उघड
पुणे, हडपसर, स्वारगेटसह बीड जिल्ह्यातील सिरसाळा, अंबाजोगाई शहर, धारूर, परळी शहर, परळी ग्रामीण, वडवणी व लातूर जिल्ह्यातील जवळपास १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. अद्यापही पोलिसांकडून दुचाकींचा शोध घेतला जात आहे. आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिक्षण नको, मौज पाहिजे..
सुशांत व महेश यांना शिक्षणाची आवड नाही. घरची परिस्थिती चांगली असतानाही त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. वाईट मित्रांच्या संगतीने ते गुन्हेगारीकडे वळले. मौजमस्ती करायला पैसे कमी पडल्याने त्यांनी दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. सुरूवातीला ते यशस्वी झाले. मात्र पोलिसांच्या तावडीतून ते वाचू शकले नाहीत.

Web Title: By selling the stolen two wheel,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.