युसूफवडगाव कृषी विभागाचे चर्चासत्र; शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:09+5:302021-08-20T04:39:09+5:30
केज : कृषी विभागाच्या वतीने केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे विभागीय कृषी संचालक यांच्या उपस्थितीत जिल्हा मासिक प्रक्षेत्र भेट ...
केज : कृषी विभागाच्या वतीने केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे विभागीय कृषी संचालक यांच्या उपस्थितीत जिल्हा मासिक प्रक्षेत्र भेट व चर्चासत्राचे आयोजन केले होते.
औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक डी. एल. जाधव यांनी एसएसके ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीस भेट देऊन कंपनीच्या उपक्रमांची माहिती करून घेतली. तसेच कंपनीने नियोजन पद्धतीने उभा केलेल्या आटा मिल, क्लिनिंग ग्रेडिंग, क्लोड रूम, गोडाऊन, औजार बँक तसेच कंपनीने उभे केलेले कृषिनिविष्ठा केंद्र याची पाहणी करून सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतातील सोयाबीन, सीताफळ लागवड पाहणी करून योग्य मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातसुद्धा असे प्रोजेक्ट उभे करून ते योग्य व नियोजन पद्धतीने कार्यान्वित करता येऊ शकतात.
यावेळी कृषी विद्यावेत्ता डॉ.वसंत सूर्यवंशी, कृषी उपसंचालक गोविंद कोल्हे, तालुका कृषी अधिकारी, केज सी.आर. देशमाने, तालुका कृषी अधिकारी, बीड बाळासाहेब गंडे, तालुका कृषी अधिकारी, अंबाजोगाई राजाराम बर्वे, तालुका कृषी अधिकारी, परळी अशोक सोनावणे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी माजलगाव, संगेकर, राजबिंडे, भगत, गोंदकर, घुले तसेच क्रांतिज्योती कंपनीचे चेअरमन, पळसखेडा कंपनीचे चेअरमन व एसएसके ॲग्रो कंपनीचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
190821\img-20210814-wa0027.jpg
युसूफवडगांव येथे कृषी विभागाच्या वतीने चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित कृषी अधिकारी व शेतकरी.