१७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? पालक संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:09+5:302021-08-12T04:37:09+5:30

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोविडमुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंच्या शाळा सुरू करण्यास परवनागी दिल्यानंतर जिल्ह्यात १५ जुलैपासून व ...

Send children to school from August 17? Parents in confusion! | १७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? पालक संभ्रमात !

१७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? पालक संभ्रमात !

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोविडमुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंच्या शाळा सुरू करण्यास परवनागी दिल्यानंतर जिल्ह्यात १५ जुलैपासून व नंतर एकूण २८६ शाळा सुरू झाल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. त्यातील ९२ शाळा संबंधित गावात कोविडचे रुग्ण आढळल्याने बंद झल्या. शहरी भागातील शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे तर ग्रामीण भागात शाळा सुरू असल्या तरी उपस्थिती अत्यंत कमी आहे. आठवी ते दहावीच्या वर्गांना फारसा प्रतिसाद नसताना आता १७ ऑगस्टपासून पहिली ते सातवीचेही वर्ग सुरू होणार आहेत. त्यातच आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराई तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासाने निर्बंध कडक केले आहेत. त्यातच डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्यानंतर पुन्हा धास्ती निर्माण झाली. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे का? याबाबत पालक संभ्रमात आहेत.

१) जिल्ह्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा - ८४३

१७ ऑगस्टला सुरू किती होणार - पाचवी ते सातवीच्या १५०

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?

पहिली - ४४८७७

दुसरी - ५०७९०

तिसरी - ५३२९७

चौथी - ४८८९५

पाचवी - ५२८३३

सहावी - ५२८९७

सातवी - ५२०१४

आठवी ते बारावीला अल्प प्रतिसाद

आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - ९६२

सुरू झालेल्या शाळा - २८६

सुरू होऊन बंद झालेल्या शाळा -९२

एकूण विद्यार्थी - २,२६, ६९५

विद्यार्थ्यांची उपस्थिती (९ ऑगस्ट) - २६२२

--------------

पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता

बीड जिल्ह्यात कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. मोठ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. लहान मुलांचे लसीकरण सुरू नाही. शाळा बंद आणि मुले घरीच असले तरी नाईलाज आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत धोका न पत्करलेले बरे राहील.

- मधुकर बांदल, पालक, शिरूर कासार.

------

कोरोनामुळे सर्वच घटक त्रस्त झाले. त्यात शैक्षणिक नुकसानही झाले. दीड वर्षांपासून मुले घरातच आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होत आहे. ऑनलाइन शिक्षण प्रभावी ठरू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. कोरोनाही नियंत्रणात आल्याने शाळा सुरू व्हायला पाहिजे. - सीताराम बांगड, पालक, बीड.

-----------------

Web Title: Send children to school from August 17? Parents in confusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.