पित्याच्या खून प्रकरणी मुलांची कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:36 AM2021-08-26T04:36:00+5:302021-08-26T04:36:00+5:30

महादेव बलभीम औटे (६०, रा. पारनेर) यांना पीककर्ज उचलायचे होते. पण, त्यास मुलगा योगेश याचा ...

Sending children to custody in father's murder case | पित्याच्या खून प्रकरणी मुलांची कोठडीत रवानगी

पित्याच्या खून प्रकरणी मुलांची कोठडीत रवानगी

Next

महादेव बलभीम औटे (६०, रा. पारनेर) यांना पीककर्ज उचलायचे होते. पण, त्यास मुलगा योगेश याचा विरोध होता. याच कारणावरून २३ ऑगस्ट रोजी दुपारी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी दोघांनीही एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी औटे कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार उरकले. मात्र, पोलिसांना कुणकुण लागल्याने हे प्रकरण उजेडात आले. हवालदार आदिनाथ तांदळे यांच्या फिर्यादीवरून मुलगा योगेश महादेव औटे, गणेश महादेव औटे, भाऊ वाल्मिक बलभीम औटे, परमेश्वर बलभीम औटे, विष्णू बलभीम औटे यांच्यावर पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनेश पाटील व सहकाऱ्यांनी पाचही जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपींना २५ ऑगस्ट रोजी पाटोदा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही मुलांना ३० पर्यंत पोलीस कोठडी, तर तीन भावांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती सहाय्यक निरीक्षक डी. बी. कोळेकर यांनी दिली.

__

Web Title: Sending children to custody in father's murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.