'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमिवर गेवराईतील अल्पवयीन मैत्रिणी प्रियकरांसोबत 'सैराट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:48 AM2019-02-14T11:48:36+5:302019-02-14T11:49:56+5:30
कोचिंग क्लास उशिरापर्यंत चालणार असल्याचे पालकांना सांगून पलायन
बीड : गेवराई शहरातील दोन अल्पवयीन मुलींनी आपल्या प्रियकरासोबत धुम ठोकली आहे. यापक्ररणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या रात्रीच त्यांनी धुम ठोकल्याने चर्चा आहे. शिवाय दोन्ही मैत्रीणी एकमेकिंच्या जिवलग असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोनाली व मोनाली (नाव बदललले) या दोघी गेवराई शहरातील एका शाळेत १० वर्गाच्या शिक्षण घेतात. बुधवारी त्या दुपारी साडे चार वाजता शिकवणीला गेल्या. साडे सहा वाजता शिकवणी सुटणार होती. सोनालीची आई रोज घ्यायला व सोडायला येते. मात्र बुधवारी सोनालीने आमच्या मॅडम साडे सात वाजेपर्यंत क्लास घेणार असल्याचे आईला सांगितले. आई साडे सात वाजता गेल्यावर सर्व प्रकार समोर आला. त्यांनी तात्काळ गेवराई पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या मुलींच्या शोधासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक गेवराईत दाखल झाले आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भारत माने, भूषण सोनार आणि अ.मा.वा.प्र.ची टिम कसून तपास करीत आहेत.