बीडमध्ये विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:44 AM2019-09-12T00:44:52+5:302019-09-12T00:45:26+5:30

बीड शहरातील विसर्जन स्थळापासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.

Settlement for immersion in seed | बीडमध्ये विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त

बीडमध्ये विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त

Next
ठळक मुद्देउत्साहात निघणार श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका : शांतताभंग केल्यास पडणार महागात

बीड : मागील १० दिवस गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात व सार्वजनिक ठिकाणी विराजमान झाले होते. बाप्पाची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी बीड शहरातील विसर्जन स्थळापासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.
श्री गणेश विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजनपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी सर्व नियोजन करण्यासाठी बैठका घेतल्या आहेत. त्याचबरोबर सर्व प्रमुख शहरात पथसंचलन करुन पाहणी देखील केली आहे. जिल्ह्यात १४०० च्या जवळपास सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. यापैकी काही जणांचे विसर्जन झाले आहे, बऱ्याच ठिकाणचे विसर्जन हे गुरुवारी होणार आहे.
बीड शहरात कंकालेश्वर मंदिराच्या जवळील विहिरीत श्री गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. मिरवणुका पारंपरिक वाद्याच्या गजरात पार पडणार आहेत. कारण कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी प्रशासनाने डीजेवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी वेगळी यंत्रणा पोलिसांकडून उभारण्यात आली असून, त्यासाठी होमगार्ड देखील तैनात असणार आहेत. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच उत्सवामध्ये कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असा असेल पोलीस बंदोबस्त
जिल्हाभरात प्रमुख शहरात आवश्यकतेनूसार फौजफाटा तैनात केला आहे. बीडमध्ये मिरवणूक मार्गावर बॅरिकेटस् लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मिरवणुका एका रांगेत पुढे-पुढे जाणार आहेत.
यावेळी २७ पोलीस निरीक्षक, ८४ सहायक निरीक्षक, फौसदार १२०० पोलीस कर्मचारी ११०० होमगार्ड व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात राहणार आहेत.
‘ड्रोन’चे असणार लक्ष
जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये बंदोबस्तासाठी ड्रोनचा देखील वापर केला जाणार आहे. त्यामाध्यमातून लाईव्ह पाहणी मिरवणुकीत केली जाणार आहे. तसेच मिरवणुकींचे चित्रिकरण देखील करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळावर पाण्यात बुडून कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी पाच जीवरक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामीण भागात देखील अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्तम पोहणाऱ्यांनी पाण्याच्या जवळ थांबून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहान प्रशासनाने केले आहे.

Web Title: Settlement for immersion in seed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.