आधार माणुसकी ग्रुपच्या वतीने सेवातीर्थ, आजोळ परिवारास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:34+5:302021-04-08T04:33:34+5:30
आधार माणुसकी ग्रुपच्या वतीने नुकतेच राक्षसभुवन ( तांब्याचे ) व मातोरी जवळील सेवातीर्थ व आजोळ परिवारास धान्य व ...
आधार माणुसकी ग्रुपच्या वतीने नुकतेच राक्षसभुवन ( तांब्याचे ) व मातोरी जवळील सेवातीर्थ व आजोळ परिवारास धान्य व किराणा किटचे वितरण करण्याचा उपक्रम आधार माणुसकी या ग्रुपच्या वतीने राबविण्यात आला. मातोरी येथील सेवातीर्थ परिवार येथे छोट्या बाळांचा सांभाळ करणाऱ्या सचिन गायकवाड यांची भेट घेतली. राक्षसभुवन (तांब्याचे) येथे वृद्धांचा सांभाळ करणारे राज तांबे यांना ही मदत देण्यात आली. यात तीन क्विंटल धान्य व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. आजोळ परिवाराला भेट दिली व आजोळ परिवारासाठी सात क्विंटल धान्य, १५ लिटरचा तेलाचा डब्बा. २५ किलो शेंगदाने, १५ किलो साखर व फळे देण्यात आली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार माणुसकीचा ग्रुपचे संचालक तथा पोलीस रणजित पवार, रामनाथ बेदरे, नागेश बेदरे, बाबू ढवान, अनिल जाधव, शंकर निर्मळ, जगन्नाथ मदने, बापू सोनवणे, नवनाथ ठोसर, विठ्ठल अढाळे, माऊली सकार्डे, राम निर्मळ, किशोर राऊत, किरण बेदरे, उमेश बेदरे, अंकुश बेदरे, संभाजी बेदरे, गजानन कवडे, डिगंबर ढवारे, वामन राऊत, रुस्तुम बेदरे, महेश मोरे, पप्पू चव्हाण,दादा राऊत, कृष्णा जगताप, सोमनाथ भवर, दादा जोगदंड, नारायण शेजुळ, श्रीराम कदमसह अनेक जण उपस्थित होते.
===Photopath===
070421\sakharam shinde_img-20210407-wa0011_14.jpg
===Caption===
गेवराई येथील आधार माणुसकी ग्रुपच्या वतीने नुकतीच सेवातीर्थ परीवार व आजोळ परीवारास मदतीच्या स्वरूपात अन्नधान्य व किराणा किट देण्याचा उपक्रम पार पडला.