दोन चोरट्यांकडून सात दुचाकी केल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:35 AM2019-11-20T00:35:43+5:302019-11-20T00:36:03+5:30
सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने गेवराई परिसरातून दोन दुचाकी चोरांना अटक केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांध्ये वाढ झाली आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून या चोरांचा शोध सुरु होता. दरम्यान सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने गेवराई परिसरातून दोन दुचाकी चोरांना अटक केली आहे. या कारवाईमुळे इतर चोऱ्यांची देखील उकल होण्याची शक्यता आहे.
स्थानिक गुन्हे शाखा पथक माजलगाव येथील दरोडा प्रकरणाचा तपास गेवराई परिसरात करत होते. यावेळी जातेगाव (ता.गेवराई) येथे दुचाकी चोरी करणारे दोघेजण आहेत. अशी माहिती खब-यामार्फत मिळाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी जातेगाव येथे जाऊन. पाहणी केली तसेच चौकशी केल्यानंतर येथील बाळु महादेव मिंदर आणि देविदास लिंबाजी पवार या दोन दुचाकी चोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने आपण दुचाकी चोरी करत असल्याची कबुली दोघांनी दिली आहे.
बीडमधील परळी परिसरातून एक दुचाकी चोरी गेली होती. ती या चोरट्यांनी चोरल्याचे उघडकीस आले. तसेच येरमाळा (जि. उस्मानाबाद) अंबड ( जि. जालना) येथून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. महादेव मिंदर आणि देविदास पवार यांना यांना पुढील तपासासाठी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विजय गोसावी, कर्मचारी तुळशीराम जगताप, जयसिंह वाघ, भास्कर केंद्रे, विकास वाघमारे, कैलास ठोंबरे, सतिष कातखडे, चालक हारके, वंजारे, हराळे यांनी केली.
३ लाखाचा मुद्देमाल केला लंपास
जातेगाव येथून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ३ लाख किंमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच इतर काही चोरीच्या दुचाकी आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचबरोबर याच्यांकडून इतर ठिकाणी कुठे गुन्हे केले आहेत का ? यासह दुचाकी चोरल्यानंतर त्याची विक्री कुठे केली जात होती याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार पोलीस पुढील कार्यवाही करणार आहेत.