वीजचोरीप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:38+5:302021-01-19T04:35:38+5:30

माजलगाव : वीजचोरी पकडल्यानंतर दंडासह बिल न भरल्याने सात जणांविरुद्ध विजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Seven charged in power theft case | वीजचोरीप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

वीजचोरीप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

Next

माजलगाव : वीजचोरी पकडल्यानंतर दंडासह बिल न भरल्याने सात जणांविरुद्ध विजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. माजलगावलगतच्या चिंचगव्हान येथील शिवाजी राधाकिशन जाधव, सलीम शफीयोदीन शेख ,शेख खय्युम दाऊद ,दशरथ ज्ञानदेव उगले व सिद्धांत नवनाथ जोगडे, पुनंदगाव येथील लता महादेव चाळक व देवखेडा येथील जगन्नाथ आश्रुबा जोगडे यांचा वीजचोरीच्या आरोपींमध्ये समावेश आहे. यातील पाच जण पिठाची गिरणी तर एक ॲक्वा जार व एक किराणा व्यवसायासाठी विजेचा चोरून वापर होत होता. सप्टेंबरमध्ये उपविभागीय अभियंता सुहास मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरी पकडण्यात आली होती. त्यानंतर, त्यांना दंडासह २ लाख ८६३ हजार ४२८ रुपये भरण्यास सांगितले असताना, त्यांनी वीजबिल न भरल्याने, येथील सहायक अभियंता प्रतापसिंह इंगळे यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Seven charged in power theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.