राक्षसभुवनमध्ये अवैध वाळूच्या सात हायवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:49+5:302021-08-27T04:36:49+5:30

गेवराई : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून राजरोस सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाईसाठी २५ ऑगस्ट रोजी रात्री जिल्हाधिकारी राधाबिनोद ...

Seven highways of illegal sand seized in Rakshasabhuvan | राक्षसभुवनमध्ये अवैध वाळूच्या सात हायवा जप्त

राक्षसभुवनमध्ये अवैध वाळूच्या सात हायवा जप्त

Next

गेवराई : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून राजरोस सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाईसाठी २५ ऑगस्ट रोजी रात्री जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक आर. राजा हे रस्त्यावर उतरले. राक्षसभुवन येथे नदीपात्रात मोठ्या फौजफाट्यासह त्यांनी छापा टाकला. यावेळी सात हायवा पकडण्यात आल्या. लोकेशनवरील जीपही ताब्यात घेतली.

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. वारंवार कारवाया करूनही माफियांचा उपद्रव सुरूच आहे. याविरुद्ध नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कंबर कसली आहे. २५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सोबत घेऊन मध्यरात्री त्यांनी राक्षसभुवन नदीपात्रात छापा टाकला. यावेळी सात हायवा पकडण्यात आल्या. दरम्यान, अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांना लोकेशन देणारी एक जीपही ताब्यात घेतली. जीपचालकावर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, तर अवैध वाळूची सात वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. तहसीलदार सचिन खाडे , पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्यासह मंडळाधिकारी, तलाठ्यांसह पोलिसांची मोठी कुमक कारवाईत सहभागी होती.

Web Title: Seven highways of illegal sand seized in Rakshasabhuvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.