सात लाख मुलांना देणार जंतनाशक गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:39 AM2021-03-01T04:39:16+5:302021-03-01T04:39:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : एक ते १९ वर्षे वयोगटातील ७ लाख ३८ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार ...

Seven lakh children will be given deworming pills | सात लाख मुलांना देणार जंतनाशक गोळी

सात लाख मुलांना देणार जंतनाशक गोळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : एक ते १९ वर्षे वयोगटातील ७ लाख ३८ हजार मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. या मोहिमेला सोमवारपासून जिल्हाभरात सुरुवात केली जाणार असून, आठवडाभर ही मोहीम चालणार आहे. या अनुषंगाने बीडमध्ये ग्रामीण व शहरी भागात आरोग्य विभागाने नियोजन केल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी २०१५ साली सुरू करण्यात आलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक सहा महिन्याला ही माेहीम राबविली जाते. परंतु, यावर्षी कोरोनामुळे अनंत अडचणी आल्या. सध्याही बीड जिल्ह्यातील दहावी व बारावीचे वर्ग वगळता शाळा बंद आहेत. त्यामुळे यावेळी आरोग्य विभागाला घरोघरी जावून मुलांना या गोळ्या द्याव्या लागणार आहेत. या दृष्टीने नियोजन झाले असून, याबाबत १६ फेब्रुवारी रोजी बैठकही घेण्यात आलेली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सांगितले. डॉ. संजय कदम, डॉ. एल. आर. तांदळे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कोण आहेत लाभार्थी ?

दिनांक १ ते ८ मार्च दरम्यान हा कार्यक्रम चालणार आहे. यात १ ते ६ वर्षे वयोगटातील सर्व बालके तसेच ६ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत न जाणारी मुले-मुलींना या जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.

कोट

जंतनाशक मोहिमेबाबत आढावा बैठक घेतली आहे. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने मोहीम पूर्ण करण्याबाबतही सूचना केल्या आहेत. सर्वांनी या गोळ्या घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पूर्ण नियोजन झालेले आहे. आजपासून याची सुरूवात होईल.

- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

---

तालुकानिहाय लाभार्थी

आरोग्य संस्था१ ते २ वर्ष२ ते १९ वर्षआवश्यक गोळ्या

बीड १०,५५९ १,६१,५३५ १,८२,९६८

गेवराई ४,९५० ८०,५२४ ७८,१७०

माजलगाव ३,२४४ ५२,७६८ ५९,६६६

परळी ४,९७८ ७५,८८५ ८५,९६२

अंबाजोगाई ४,५५८ ६९,४९९ ७८,७२८

धारूर २,४८६ २५,७६४ २९,५८३

वडवणी २,४३४ १९,१५५ २२,२८८

केज ५,००४ ४८,५९८ ५५,९६०

पाटोदा १,९९८ ३२,५०६ ३६,७५६

शिरूर २,०१२ ३२,७२९ ३७,००७

आष्टी ४,४४५ ५१,७४२ ५६,१९७

एकूण ग्रामीण ४६,६७८ ६,५०,७०४ ७,२३,२८५

गेवराई ८८७ ११,३१४ १२,८८९

माजलगाव १,०६८ १४,८३० १६,८४७

धारूर ४७० ६,५३० ७,४१८

केज ४३३ ६,०१२ ६,८२९

शहरी एकूण २,८५८ ३८,६८६ ४३,९८३

जिल्हा एकूण ४९,५३६ ६,८९,३९० ७,६७,२६८

Web Title: Seven lakh children will be given deworming pills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.