बीडमध्ये आणखी सात जण कोरोनामुक्त; आतापर्यंत ७१ बाधित झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 04:12 PM2020-06-18T16:12:56+5:302020-06-18T16:13:48+5:30

धारूर, गेवराई व बीड शहरातील बाधित उपचारानंतर परतले घरी

Seven patients coronavirus free in Beed; So far 71 have been affected cured | बीडमध्ये आणखी सात जण कोरोनामुक्त; आतापर्यंत ७१ बाधित झाले बरे

बीडमध्ये आणखी सात जण कोरोनामुक्त; आतापर्यंत ७१ बाधित झाले बरे

Next
ठळक मुद्देबुधवार व गुरूवारी सात जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

बीड : जिल्ह्यातील आणखी सात जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७१ कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी तिघांचा मृत्यू झाला असून ७१ जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. बुधवार व गुरूवारी सात जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील तिघे, गेवराई तालुक्यातील मालेगाव बुदू्रक येथील एक, बीड शहरातील मसरत नगर  भागातील तिघांचा समावेश आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा बळी कोरोनामुळे गेलेला आहे. केजच्या महिलेची अद्याप जिल्ह्यात नोंद नसल्याने अधिकृतरित्या मृतांचा आकडा तिनच आहे.

दिलासा; सर्व रिपोर्ट निगेटिव्ह
कोरोना संशयित असलेल्या ३६ लोकांचे गुरूवारी स्वॅब घेतले होते. याचे अहवाल दुपारी चार वाजता प्राप्त झाले. सर्वांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

Web Title: Seven patients coronavirus free in Beed; So far 71 have been affected cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.