सतरा ग्रामसेवकांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:07 AM2019-12-14T00:07:00+5:302019-12-14T00:08:28+5:30
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागामध्ये इंटरनेट सेवा मागील ८ दिवसांपासून विस्कळीत झाली होती. त्यामुळे महत्त्वाचे कामकाज देखील ठप्प ...
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागामध्ये इंटरनेट सेवा मागील ८ दिवसांपासून विस्कळीत झाली होती. त्यामुळे महत्त्वाचे कामकाज देखील ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्यांची महत्त्वाची कामे असतात. जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार याच कार्यालयातून केला जातो. मात्र, येथील काही विभागात इंटरनेट सेवा मगाील ८ दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. सर्व कामकाज आॅनलाईन चालते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील काम कसे करावे असा पेच पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंतप्रधान किसान सन्मान योजना, पाणीपुरवठा, गायरान जमीन, जमाबंदी, शेतकरी अनुदान यासह इतर कामकाज चालते ते ठप्प झाले आहे. तसेच आयुक्त व मंत्रालयातून इतर वरिष्ठ कार्यालयातून मेलद्वारे संदेश येतात. ते पाहणे देखील कर्मचाºयांना शक्य होत नाही. त्यामुळे कर्मचारी देखील प्रलंबित राहिलेले कामकाज करत होते.
या विभागात काहीवेळा सर्वसामान्य देखील कामानिमित्त येतात. मात्र, इंटरनेट बंद असल्यामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प असल्याची सबब सांगून त्यांना वापस पाठवले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाचा खोळंबा झाल्याचे चित्र ८ दिवसांत पाहायला मिळाले. कर्मचाºयांना विचारले असता वरिष्ठांना इंटरनेट बंद असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी देखील संबंधित यंत्रणेला सेवा तात्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे सांगण्यात आले. मात्र, गत आठ दिवसांमध्ये ज्या नागरिकांचे कामकाज इंटरनेट सेवा विस्कळीत असल्यामुळे होऊ शकले नाही त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.