नाल्यातील सांडपाणी येऊ लागले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:02 AM2021-02-18T05:02:41+5:302021-02-18T05:02:41+5:30

बीड : शहरातील अंबिका चौक परिसरात नाल्या तुंबल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. नालीतील घाण रस्त्यावर पसल्याने दुर्गंधी ...

Sewage from the nala started coming on the road | नाल्यातील सांडपाणी येऊ लागले रस्त्यावर

नाल्यातील सांडपाणी येऊ लागले रस्त्यावर

Next

बीड : शहरातील अंबिका चौक परिसरात नाल्या तुंबल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. नालीतील घाण रस्त्यावर पसल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यावरून जाताना वाहने देखील घसरू लागली आहेत.

प्रभागातील रस्त्याच्या मधोमध नाली

बीड: शहरातील प्रभाग क्रमांक ११ आमराई, बालेपीरमध्ये काही लोकांनी घरातील सांडपाणी जावे यासाठी रस्त्यावर मधोमध नाली खोदून ठेवली आहे. या भागातील नागरिकांना आपले वाहन येथून नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगरसेवक, नगरपरिषदेतील अधिकारी सुद्धा याला विरोध करताना दिसत नाहीत.

तिप्पटवाडीत शिवजयंती उत्सवाचे आयोजन

बीड : येथून जवळच असलेल्या तिप्पटवाडी -मुर्शदपूर फाट्यावर १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिर, वृक्षवाटप, मुलांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा परीक्षा तसेच सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत अन्नदान आदी उपक्रम ठेवल्याचे बजरंगबली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण भगत यांनी सांगितले.

हॉस्पिटलची कसून चौकशी करावी

बीड : शहरातील वीर हॉस्पिटलमध्ये ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे, दिलीप भोसले, बाबूराव सुरवसे, रामनारायण जाधव आदींनी पत्रकाद्वारे केली आहे.

उंच गतिरोधकाचा होतोय अडथळा

बीड : शहरातील पेठ भागामध्ये रंगार गल्ली, विठ्ठल मंदिरापासून शनी मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर गतिरोधक नियमानुसार केलेले नाहीत. उंच असलेल्या गतिरोधकांमुळे वाहने चालवण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे गतिरोधकांची उंची कमी करण्याची मागणी होत आहे.

वीजबिल न भरणाऱ्यांवर कारवाई

बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर आकडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. यामुळे वेळोवेळी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

बीड शहरात अवैध प्रवासी वाहतूक

बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागात सध्या खासगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याचे दिसून येत आहे.

कला, विज्ञान महाविद्यालयात कार्यक्रम

बीड : तालुक्यातील चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रुग्णांना फळे, गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विलास महाराज शिंदे, महाविद्यालयाचे स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपंगे, उपप्राचार्य पंडित गुंजाळ, सरपंच मधुकर तोडकर आदी उपस्थित होते.

आर.आर. पाटील यांना अभिवादन

बीड : येथील विचारवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बोगस खडी क्रशरवर कारवाई करा

बीड : जिल्ह्यात २०० खडी क्रशर असून, फक्त बोटावर मोजण्याइतकेच शासनाच्या नियमाप्रमाणे सुरू आहेत. बाकीचे शासनाचे नियम धाब्यावर बसून सुरू आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल कर बुडत आहे. याला जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा उदयनराजे प्रतिष्ठानचे युवक जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोसले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Web Title: Sewage from the nala started coming on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.